अनुभवी गोलंदाज नसल्याचा फटका - मिताली

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

बडोदा - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाने आमचे डोळे उघडले आहेत. या मालिकेने आमच्या कमकुवत बाजूच दाखवून दिल्या. आमच्या मध्यमगती गोलंदाजांत अनुभवाचा अभाव आहे. तसेच फलंदाजीतही प्रकर्षाने सुधारणा हवी आहे, असे भारतीय कर्णधार मिताली राजने सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही एकदिवसीय सामन्यात भारतास एकतर्फी हार पत्करावी लागली. यामुळे मिताली निराश झाली. आमच्या मध्यमगती गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय लढतीचा पुरेसा अनुभव नाही, हेच दिसून आले. ऑस्ट्रेलियासारख्या चांगल्या संघाविरुद्ध काहीही सहजपणे गवसणार नाही. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे, असे मितालीने सांगितले.

आम्ही दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकली होती; मात्र ताकदवान ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरुद्धची मालिका कधीच सोपी नसेल. आपली ताकद कशात आहे, हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल. ज्याद्वारे खेळाच्या अन्य भागांत जरी कमकुवत असलो तरी त्याची भरपाई करता येईल. नेमके हेच या मालिकेत घडले नाही, असेही तिने नमूद केले. 

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने किमान चांगल्या धावा केल्या. त्यांचे तळाचे फलंदाजही सहज खेळले. या टप्प्यातच आपण योजनेची अंमलबजावणी करू शकलो नाही. क्षेत्ररक्षक एका बाजूला आणि गोलंदाजी दुसऱ्या बाजूला असेल, तर चौकार स्वीकारावेच लागतील.
- मिताली राज, भारतीय महिला क्रिकेट

Web Title: sports news cricket Mitali Raj, Indian women cricket