दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी अतिशय भेदक : रोहित 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

डेल स्टेनच्या पुनरागमनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची ताकद अधिकच वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणात विविधता आहे. त्यांच्या प्रत्येक गोलंदाजीची वेगळी खासियत आहे, कागिसो रबाडा हा उचंपुरा गोलंदाज अधिक ताकदीने चेंडू खेळपट्टीवर आपटू शकतो, असे रोहित शर्माने सांगितले. 

जोहान्सबर्ग : "दक्षिण आफ्रिकेचा वेगवान मारा अतिशय भेदक आहे. त्यांचा सामना करताना आम्ही कोणत्याही भ्रमात राहणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांची गोलंदाजीही त्यांच्या मायदेशात बलाढ्य असते; पण दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी इतरांपेक्षा वेगळी आहे'', असे मत भारताचा आक्रमक शैलीचा फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केले. 

डेल स्टेनच्या पुनरागमनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची ताकद अधिकच वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणात विविधता आहे. त्यांच्या प्रत्येक गोलंदाजीची वेगळी खासियत आहे, कागिसो रबाडा हा उचंपुरा गोलंदाज अधिक ताकदीने चेंडू खेळपट्टीवर आपटू शकतो, असे रोहित शर्माने सांगितले. 

डेल स्टेनबरोबर मॉर्नी मॉर्कलही दुखापतीनंतर संघात परतला आहे. स्टेनकडे नवा; तसेच जुना चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. वेरनॉन फिलॅंडर हा दक्षिण आफ्रिकेतील वातावरणात घातक ठरू शकतो. एकाच टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. तो अजिबात भरकटत नाही. त्यामुळे या सर्वांचा सामना करणे सोपे नसेल, असे रोहित म्हणाला. 

रोहित शर्माने कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवलेले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली. शतकही केले होते. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत झंझावाती द्विशतक करताना भारतीय संघाला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत विजेतेपदही मिळवून दिले होते. रोहितच्या एकूणच फॉर्मबाबत दक्षिण आफ्रिकेत अंतिम संघ निवडताना त्याचा विचार होऊ शकतो. 

Web Title: sports news cricket news Rohit Sharma statement on South Africa bowling attack