समालोचक गावसकरांनीही केला नागीण डान्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

कोलंबो - निदहास करंडक टी-२० तिरंगी मालिकेत काही सनसनाटी खेळी बघायला मिळाल्या. त्याहीपेक्षा या मालिकेत सातत्याने बघायला मिळाला तो बांगलादेशच्या खेळाडूंनी जल्लोष करताना केलेला नागिण डान्स. बांगलादेशच्या खेळाडूंच्या या नागिण डान्सला सोशल मीडियावर जबरदस्त प्रसिद्धी तसेच लाइक मिळाले. त्याची भुरळ अंतिम सामन्यात समालोचन करणाऱ्या सुनील गावसकरांनाही पडली.

रोहित शर्मा बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत असताना अमीर सोहेल आणि ब्रेट लीच्या साथीत समालोचन करणाऱ्या गावसकरांना मोह आवरला नाही आणि त्यांनी तेथेच नागिण डान्स केला. सोशल मीडियाने हा व्हिडियो लगेच व्हायरल केला आणि त्यावर चाहत्यांच्या धडाधड लाइक पडल्या; पण दुसरीकडे बांगलादेशचे चाहते मात्र चिडले होते. गावसकरांच्या नागिण डान्स करतानाचे छायाचित्र नंतर ट्‌विटरवरून चांगलेच फिरत होते. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही तशाच उमटत होत्या.

Web Title: sports news cricket T-20 sunil gavaskar nagin dance