एकदिवसीय क्रमवारीत कोहली पुन्हा अव्वल

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

दुबई - भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. चॅंपियन्स स्पर्धेला सुरवात होताना कोहली एबी डिव्हिलर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या मागे होता. स्पर्धेतील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नाबाद अर्धशतकी खेळीने त्याने दोघांनाही मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. शिखर धवनही पहिल्या दहांत आला आहे. गोलंदाजीत एकही भारतीय पहिल्या दहांत नाहीत. अश्‍विन दोन स्थान घसरून विसाव्या, तर जडेजा तीन स्थान घसरून २९व्या स्थानावर आला आहे. भारतीय गोलंदाजांसाठी हेच सर्वोत्तम आहेत.

दुबई - भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. चॅंपियन्स स्पर्धेला सुरवात होताना कोहली एबी डिव्हिलर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या मागे होता. स्पर्धेतील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नाबाद अर्धशतकी खेळीने त्याने दोघांनाही मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. शिखर धवनही पहिल्या दहांत आला आहे. गोलंदाजीत एकही भारतीय पहिल्या दहांत नाहीत. अश्‍विन दोन स्थान घसरून विसाव्या, तर जडेजा तीन स्थान घसरून २९व्या स्थानावर आला आहे. भारतीय गोलंदाजांसाठी हेच सर्वोत्तम आहेत. भुवनेश्‍वर २३, उमेश यादव ४१ आणि जसप्रित बुमरा ४३व्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आघाडीवर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन आघाडीवर आहे.

Web Title: sports news cricket virat kohli