अनिकेतच्या दोन गोलांमुळे ॲरोज विजयी

अनिकेतच्या दोन गोलांमुळे ॲरोज विजयी

पणजी - अनिकेत जाधव याने नोंदविलेल्या दोन गोलांच्या बळावर इंडियन ॲरोज संघाने बुधवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाने चेन्नई सिटी एफसी संघावर ३-० असा एकतर्फी विजय नोंदविला.

कोल्हापूरच्या अनिकेतने पहिला गोल २०व्या मिनिटास नोंदविला. नंतर ५८व्या मिनिटास त्याने वैयक्तिक दुसरा गोल केला, तर तिसरा गोल बोरिस सिंगने शेवटच्या मिनिटास नोंदविला. अनिकेत सामन्याचा मानकरी ठरला. नॉर्टन यांनी आजच्या लढतीत ४-५-१ व्यूहरचना अवलंबिली व ती कमालीची यशस्वी ठरली. चेन्नई संघात परदेशी खेळाडू होते, परंतु हा संघ तरुण रक्ताच्या ॲरोज समोर साफ निष्प्रभ ठरला.

भारताच्या १७ वर्षांखालील विश्वकरंडक संघातून खेळलेल्या अनिकेतने राहुल कन्नोलीच्या असिस्टवर ॲरोज संघाला स्वप्नवत आघाडी मिळवून दिली. राहुल क्रॉस पासवर अनिकेतने गोलक्षेत्रात चेंडू नियंत्रित केला आणि नंतर सणसणीत फटक्‍यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविले. ५४व्या मिनिटास ॲरोजची आघाडी वाढली. एडमंड लालरिनडिकाच्या असिस्टवर अनिकेत जाधवचा धडाका रोखणे चेन्नई सिटीला शक्‍य झाले नाही. त्याचा हेडर  भेदक ठरला. सामन्याच्या शेवटच्या मिनिटास चेन्नई सिटीच्या विस्कळित बचावाचा लाभ उठवत बोरिस सिंगने गोल नोंदविला व  ॲरोजच्या स्पृहणीय विजयावर शिक्कामोर्तब केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com