थॅंक्‍यू इंडिया! जणू मायदेशात खेळलो 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

वडील निवडणूक प्रचारात व्यस्त 
जॉर्ज विया हे लायबेरियाचे आहेत. ते तेथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे सामन्यापूर्वी टीमचे वडिलांशी बोलणे होऊ शकले नाही. त्याने आईला मेसेज पाठविला. ती खूप आनंदी आहे, असे सांगून टीमने पालकांचे आभार मानले.

नवी दिल्ली : सामन्यासाठी टनेलमधून बाहेर येत असताना आम्हाला जणू काही मायदेशात असल्यासारखेच वाटत होते. दिल्लीतील प्रेक्षकांनी भरभरून प्रोत्साहन दिले. थॅंक्‍यू इंडिया, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया अमेरिकेचा 17 वर्षांखालील संघाचा हॅट्ट्रिकवीर टीम विया याने केली. थॅंक्‍यू इंडिया अशी सुरवात करीतच त्याने ही भावना व्यक्त केली. 
टीम हा एक काळ गाजविलेले आफ्रिकी फुटबॉलपटू जॉर्ज यांचा मुलगा आहे. जॉर्ज हे बॅलन डी ओर अर्थात सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब जिंकलेले पहिले आफ्रिकी फुटबॉलपटू आहेत. ते अमेरिकेत काही काळ होते. तेव्हा टीमचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. 

पॅराग्वेविरुद्ध बाद फेरीत त्याने हॅट्ट्रिक नोंदविली. त्यामुळे नेहरू स्टेडियमवर तो हिरो ठरला. सामन्यानंतर त्याने सांगितले की, भारतीय आमच्याशी मित्रत्वाने वागले आहेत. त्यांच्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत. 

टीमने उत्तरार्धात नोंदविलेला वैयक्तिक दुसरा गोल स्पर्धेत सर्वोत्तम ठरण्याची दाट शक्‍यता आहे. फ्रेंच साखळीत पॅरिस सेंट जर्मेनकडून (पीएसजी) निवड झालेल्या टीमने या यशाचे श्रेय संघाला दिले. तो म्हणाला की, मला पूर्वी फार अप्रतिम गोल करता आले नव्हते. त्यामुळे ही कामगिरी स्पेशल आहे, पण अँड्य्रू कार्लटॉन आणि ख्रिस ग्लॉस्टर यांच्या पासशिवाय ती साकार होऊ शकली नसती. 

टीम पीएसजीच्या राखीव संघाबरोबर सराव करतो. त्याने मोसमाअखेरपर्यंत मुख्य संघात स्थान मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला. नेमारच्या साथीत खेळणे स्वप्नवत असेल असे तो म्हणाला. 

वडील निवडणूक प्रचारात व्यस्त 
जॉर्ज विया हे लायबेरियाचे आहेत. ते तेथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे सामन्यापूर्वी टीमचे वडिलांशी बोलणे होऊ शकले नाही. त्याने आईला मेसेज पाठविला. ती खूप आनंदी आहे, असे सांगून टीमने पालकांचे आभार मानले.

Web Title: Sports news football compitition in india