नेपाळविरुद्ध ब्ल्यू टायगर्सचा सराव अपेक्षित
मुंबई - जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरमध्ये आल्याचा आनंद नेपाळला पराजित करून साजरा करण्याची संधी भारतीय फुटबॉल संघास आहे. ऐनवेळी लेबनॉनने खेळण्यास नकार दिल्यावर भारताने त्यांच्याऐवजी नेपाळला तयार केले, पण ब्ल्यू टायगर्स नेपाळला मैदानात दयामाया दाखवण्याची शक्यता कमी आहे.

आशिया करंडक पात्रता स्पर्धेतील किर्गीझस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीच्या पूर्वतयारीसाठी हा सामना होत आहे. त्यामुळे भारतीय या सामन्यात पूर्ण जोषात खेळणार नाहीत किंवा आपले कसब पणास लावणार नाहीत. भारतीय या सामन्यात ४-१-३-२ चा प्रयोग करणार असेच दिसत आहे. त्यासाठी रॉवलीन बॉर्गेस याला होल्डिंग मिडफिल्डर म्हणून खेळवण्यात येईल, तर सुनील छेत्री हा मध्यरक्षक असेल.
नेपाळसाठी ही लढत महत्त्वाची आहे. भारताने आशिया करंडक पात्रता स्पर्धेच्या ‘अ’ गटात म्यानमारला सलामीला हरवून गटात आघाडी घेतली आहे, त्याचवेळी ‘फ’ गटात असलेले नेपाळ सलामीला फिलिपीन्सविरुद्ध १-४ असे पराजित झाले. नेपाळने या पराभवामुळे माजी कर्णधार अनिल गुरुंग याला वगळले आहे. त्याचबरोबर पाहुण्यांना दुखापतींनीही सतावले आहे.
भारताने नेपाळविरुद्ध १८ वर्षांत हार पत्करलेली नाही. दोन वर्षांपूर्वीच्या सॅफ स्पर्धेत भारताने नेपाळचा ४-१ धुव्वा उडवला होता. याच निकालाची पुनरावृत्ती अपेक्षित असेल. विंगर उदांता सिंग याच्या अनुपस्थितीत भारत खेळणार आहे. त्याच्या पासवरच सुनील छेत्रीने म्यॅनमारविरुद्धचा निर्णायक गोल केला होता.
आंतरराष्ट्रीय लढत
भारत वि. नेपाळ
भारताचे नेपाळविरुद्ध तीन विजय, दोन बरोबरी
भारताचा नेपाळविरुद्धच्या १८ पैकी १२ लढतींत विजय आणि दोन पराभव
ठिकाण - मुंबई फुटबॉल एरिना, शहाजीराजे क्रीडा संकुल, अंधेरी.
वेळ - संध्याकाळी ७ पासून