श्रीकांत, प्रणॉय उपांत्य फेरीत

पीटीआय
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पॅरिस - भारताच्या किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू यापूर्वीच उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.

गेल्याच आठवड्यात डेन्मार्कमध्ये विजेतेपद  मिळवणाऱ्या श्रीकांतने चीनच्या शी युकी याचे आव्हान ८-२१, २१-१९, २१-९ असे परतवून लावले. अन्य एका उपांत्य लढतीत भारताच्याच एच. एस. प्रणॉयने कोरियाच्या जीऑन ह्योओक जीन याचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला. पुरुष एकेरीत आता श्रीकांत आणि प्रणॉय यांच्यातच उपांत्य फेरीची लढत होणार आहे. 

Web Title: sports news French Super Series Badminton Tournament