कोचच्या ड्रग विक्रीमुळे गॅटलिनभोवती संशय

कोचच्या ड्रग विक्रीमुळे गॅटलिनभोवती संशय

लंडन - उत्तेजक चाचणीत दोनदा दोषी ठरलेला जागतिक शंभर मीटर विजेता जस्टीन गॅटलीन याच्याभोवती पुन्हा एकदा उत्तेजक वापराचे संशयाचे धुके निर्माण झाले आहे. गॅटलीनच्या मार्गदर्शकांनी अंडरकव्हर रिपोर्टरला उत्तेजक विकण्याचा प्रयत्न केल्यामुळे जगज्जेता वादात  सापडला आहे.

गॅटलीनचे मार्गदर्शक डेनिस मिशेल; तसेच माजी एजंट रॉबर्ट वॅगनर यांनी उत्तेजक विकण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्या वेळी ही उत्तेजके अमेरिकेत पाठवण्याचीही तयारी दाखवली, असे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे. या प्रकरणाची यापूर्वीच जागतिक महासंघाच्या विशेष समितीने तसेच अमेरिका ॲथलेटिक्‍स महासंघाच्या उत्तेजक प्रतिबंधक समितीने चौकशी सुरू असल्याचेही बातमीत म्हटले आहे. 

जागतिक स्पर्धेत शंभर मीटर शर्यत जिंकताना गॅटलीनने उसेन बोल्टला मागे टाकले होते. हे यश खेळाच्या प्रतिमेसाठी योग्य नव्हे, असे आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टीयन को यांनी सांगितले होते. नव्या आरोपाची सखोल चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गॅटलीनवर उत्तेजकांचा वापर केल्याबद्दल २००१ मध्ये एका वर्षाची; तर २००६ मध्ये चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 

गॅटलीन संशयाच्या भोवऱ्यात येताच त्याच्या कायदेशीर टीमने गेल्या पाच वर्षांतील उत्तेजक चाचणीचे अहवालच प्रसिद्धीस दिले; तर गॅटलीनचे दीर्घकाळ एजंट असलेल्या रेनाल्डो नेहेमिया यांनी वॅगनर हे काही महिन्यांकरिताच एजंट होते, असा दावा केला. त्याचबरोबर वॅगनर आणि मिशेल यांनी उत्तेजक विक्रीबाबत चर्चा केली, त्या वेळी गॅटलीने तिथे नव्हता. त्या दोघांनी ॲथलेटिक्‍सवरील चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यास अडीच लाख डॉलरच्या मोबदल्यात ड्रग देण्याची तयारी दाखवली होती, असा दावा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com