पाकवरील चौकारासह अंतिम फेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ढाका - भारताने पाकिस्तानविरुद्ध चार गोलांचा धडाका लावत आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अखेरच्या दहा मिनिटांत तीन गोल नोंदवित भारताने भारदस्त विजय नक्की केला.

अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला केवळ बरोबरी पुरेशी होती, पण कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजीगिषुवृत्तीने खेळ करीत भारताने आगेकूच थाटात नक्की केली.

पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. मध्यंतरासही ही कोंडी कायम होती. सत्‌बीरने सुंदर खेळ करीत पहिला गोल नोंदविला. ललित उपाध्यायच्या बॅक पासवर त्याने प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवित गोली अमजद अली याच्या डोक्‍यावरून चेंडू जाळ्यात मारला.

अखेरच्या चौथ्या सत्रात पाककडून जोरदार प्रतिआक्रमण अपेक्षित होते, पण भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवित पाकला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. सुरवातीला अमजदने चेंडू हाताने अडविला. त्यानंतर थोड्याच वेळात भारताला आणखी एक कॉर्नर मिळाला. त्यावर हरमनप्रीतने आधी डाव्या आणि लगेच उजव्या बाजूने फटका मारत अमजदला चकविले.

या गोलमुळे धक्का बसलेल्या पाकला सावरण्यास वेळ लागला. त्यांच्या क्षेत्रात चेंडू मिळताच ललित उपाध्यायने संधी साधली. अमजदने चेंडू अडविला, पण रिबाउंडवर ललितने काम फत्ते केले.

यानंतर आकाश दीप सिंगने रचलेल्या चालीवर गुर्जंतने गोल केला.

निकाल
भारत ः ४ (सत्‌बीर सिंग ३९, हरमनप्रीत सिंग ५१, ललित उपाध्याय ५२, गुर्जंत सिंग ५७) विवि पाकिस्तान ः ०

Web Title: sports news hockey