वेगवान गोलंदाजीसमोर शरणागती

गुरुवार, 18 जानेवारी 2018

सेंच्युरियन - वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय संघाने पुन्हा एकदा शरणागती पत्करली. घरच्या मैदानावर धावांचे रतीब टाकणाऱ्या फलंदाजांची बॅट परदेशात गेल्यावर जणू ‘म्यान’ झाली. पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारल्यावर भारताचा दुसरा डाव जवळपास पहिल्या डावाच्या निम्म्या धावसंख्येवर संपुष्टात आला. पदार्पण करणाऱ्या लुंगी एन्गिडीने दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांच्या संयमाची कसोटी बघितली आणि सहा गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेला १३५ धावांनी विजय मिळवून दिला. दुसरा कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. सामन्याचा मानकरी अर्थातच एन्गिडी ठरला.

चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर भारताचा पराभव दिसू लागला होता. त्यामुळे पाचव्या दिवशी बुधवारी यजमान संघ भारताचे उर्वरित सात फलंदाज किती झटपट बाद करणार किंवा भारताचे सात फलंदाज किती प्रतिकार करणार, हा औत्सुक्‍याचा भाग होता. यापैकी दुसरी गोष्ट घडलीच नाही. भारतीय फलंदाज प्रतिकार करू शकले नाहीत. भारतीय फलंदाज झटपट बाद होताना पाहून पंचांनीही उपाहाराची वेळ दहा मिनिटे पुढे ढकलली. पहिल्या डावात आत्मविश्‍वासाने फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज उभे राहतील ही आशा त्यांनीच साफ फोल ठरवली. पाचव्या दिवशी चेतेश्‍वर पुजाराने पहिल्या डावात केलेल्या चुकीची झेरॉक्‍स काढली. शक्‍य नसलेली धाव पळताना पुजारा धावबाद झाला. पार्थिव पटेलची छोटी खेळी मॉर्ने मॉर्केलने अफलातून झेल घेत संपवली. हार्दिक पंड्याने बाहेरच्या चेंडूवर विकेट गमावली. अश्‍विननेदेखील त्याचाच कित्ता गिरवला. त्यानंतर महंमद शमीने रोहित शर्माला साथ दिल्याने भारताचा पराभव किंचित लांबला. अर्धशतकी भागीदारी करताना रोहितने तसेच शमीने चांगले फटके मारले. रोहित शर्माचा ए बी डिव्हिलर्सने अफलातून झेल पकडला आणि पंचांनी उपहाराची वेळ वाढवली. पुढच्या दहा मिनिटांत शमी आणि बुमरा तंबूत परतले. 

संक्षिप्त धावफलक -
दक्षिण आफ्रिका - ३३५ आणि २५८, भारत - ३०७ आणि १५१ (रोहित शर्मा ४७, महंमद शमी २८, इशांत शर्मा नाबाद ४, कागिसो रबाडा ३-४७, लुंगी एन्गिडी ६-३९).

Web Title: sports news india vs south africa cricket Centurion