इयन ह्युमच्या हॅट्‌ट्रिकमुळे ब्लास्टर्सची दिल्लीवर मात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नवी दिल्ली - इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) कॅनडाचा ३५ वर्षीय स्ट्रायकर इयन ह्युम याच्या सनसनाटी हॅट्‌ट्रिकच्या जोरावर केरळा ब्लास्टर्सने दिल्ली डायनॅमोजचा ३-१ असा धुव्वा उडविला. पूर्वार्धात खाते उघडलेल्या ह्युमने सामन्याच्या अंतिम टप्प्यात आणखी दोन गोल केले.

आयएसएलमध्ये त्याने २५ गोलांचा टप्पासुद्धा पार केला. त्याचे एकूण २६ गोल झाले आहेत. या सामन्यात डोक्‍याला लागूनही बॅंडेज बांधून मैदानावर उतरलेल्या ह्युमने ब्लास्टर्सचा सहमालक मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.

ब्लास्टर्सने नऊ सामन्यांत दुसराच विजय मिळविला. त्यांच्या तब्बल पाच लढती बरोबरीत सुटल्या आहेत. त्यांच्या खात्यात केवळ दोन पराभव आहेत. ब्लास्टर्सने ११ गुणांसह आठवरून दोन क्रमांक प्रगती करत सहावे स्थान मिळविले. त्यांनी एटीके (९ गुण) आणि जमशेदपूर एफसी (१०) यांना मागे टाकले.

Web Title: sports news indian super league competition