इंदूरची अमी कमानी भारताची पहिली आशियाई स्नूकर विजेती

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

यांगून (म्यानमार), - इंदूरच्या अमी कमानी हिने आशियाई स्नूकर स्पर्धेत विजेतेपद जिंकले. अशी कामगिरी केलेली ती भारताची पहिलीच महिला ठरली.

तिने अंतिम फेरीत थायलंडच्या सिरीपापोर्न नुआनथाखामजान हिला ३-० असे हरविले. गटसाखळीत ती अपराजित राहिली. उपांत्यपूर्व फेरीत तिने म्यानमारच्या अये मिंग आँगला ३-०, उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या का काई वॅनला ३-१ असे हरविले. किरथ भंडालने उपांत्य फेरी  गाठत ब्राँझ नक्की केले. ती सिरीपापोर्नकडून हरली.

पंकजचे वर्चस्व
आशियाई बिलियर्डसमध्ये पंकज अडवानीने देशबांधव भालचंद्र भास्करला हरवित जेतेपद राखले. उपांत्य फेरी गाठलेले चौघे भारताचेच होते. पंकजने कारकिर्दीत सातव्यांदा हे जेतेपद मिळविले. पंकज व भास्कर हे दोघे बंगळूरचे असून, एकत्र सराव करतात. रूपेश शहा व ध्वज हरिया यांनी उपांत्य फेरीतील प्रवेशासह ब्राँझ नक्की केले. भारताने या स्पर्धेतून एकूण सहा पदके कमावली.

Web Title: sports news indur ami kamani world snooker championship

टॅग्स