शमीचा आयपीएल सहभागही धोक्‍यात

पीटीआय
रविवार, 11 मार्च 2018

नवी दिल्ली - पत्नीने केलेल्या एकापाठोपाठ एक गंभीर आरोपांमुळे वेगवान गोलंदाज महंमद शमीला बीसीसीआयच्या वेतनश्रेणीतून बाहेर काढण्यात आलेच आहे. आता आयपीएलमधील त्याचा सहभागही धोक्‍यात आला आहे. दिल्ली संघाने त्याला आपल्या संघात घेतले असले तरी बीसीसीआयकडून ते आदेशाची वाट पाहत आहेत.

पत्नीने केलेल्या आरोपांनंतर शमीविरुद्ध अनेक गुन्हे कोलकता पोलिसांनी दाखल केले आहेत. तिने आरोप करताच दुसऱ्या दिवशी जाहीर झालेल्या वेतनश्रेणी करारातून शमीला दूर करण्यात आले होते. माझ्याविरुद्ध हे कटकारस्थान आहे. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, अशा प्रकारे शमी ट्‌विटवरून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु बीसीसीआयकडून सूचना मिळताच त्याला दिल्ली संघाचे फ्रॅंचाईजही संघातून डच्चू देऊ शकतात. यंदाची आयपीएल ७ एप्रिलपासून सुरू होत आहे. बीसीसीआयकडून आम्ही पुढील सूचना मिळण्याची प्रतीक्षा करत आहोत. बीसीसीआयकडे तशी विचारणाही केली आहे, अशी माहिती दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मुख्य कार्यकारी हेमंत दुआ यांनी दिली.

शमीला वेतनश्रेणी द्यायला हवी - चेतन चौहान
शमीच्या विरोधात त्याच्या पत्नीने आरोप करत पोलिसांत तक्रार केली असली, तरी तो त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. त्याचा खेळाशी संबंध नाही. त्यामुळे त्याला बीसीसीआयने वेतनश्रेणी द्यायला हवी होती, असे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांनी म्हटले आहे. हा त्याचा खासगी विषय असल्यामुळे क्रिकेटशी संबंध नाही. सुदैवाने बीसीसीआयने त्याची वेतनश्रेणी रोखली आहे, रद्द केलेली नाही. वेतनश्रेणी ही मैदानावरील कामगिरीमुळे मिळत असते, तसेच त्याला अजून न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही, असेही चौहान म्हणतात.

Web Title: sports news IPL Mohammed Shami BCCI