आयटीएफ टेनिस स्पर्धेत ऋतुजा-कनिकाला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

शर्म अल शेख (इजिप्त) - भारताच्या ऋतुजा भोसले-कनिका वैद्य जोडीने १५ हजार डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्यांनी लिंडा प्रेन्कोविच (जर्मनी)-जेलेना स्टोजानोविच (ऑस्ट्रेलिया) यांना ६-२, ६-४ असे हरविले. त्यांनी उपांत्य फेरीत लॉरा ॲश्‍ले (ऑस्ट्रेलिया)-रामू यूएदा (जपान) यांना ६-१, ७-६ (७-५) असे हरविले होते. 

उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी जॅकेलिन कॅबाजावार्ड (स्वीडन)-डेस्पीना पापामायकैल (ग्रीस) या अग्रमानांकित जोडीला ६-३, १-६, १०-३ असा धक्का दिला होता. पहिल्या फेरीत त्यांनी एलेन ॲश्‍ले (ऑस्ट्रेलिया)-कॅमिला कोकेलाद्‌झे (रशिया) यांना ६-२, ६-१ असे हरविले होते. . एकेरीत ऋतुजा जॅकेलीनकडून दुसऱ्या फेरीत १-६, ६-३, १-६ असे हरली होती. आता ती येथेच होत असलेल्या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

चौथे विजेतेपद
ऋतुजाचे हे कारकिर्दीत दुहेरीतील चौथे आयटीएफ विजेतेपद आहे. याआधी तिन्ही विजेतिपदे तिने दहा हजार डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धांत मिळविली होती. २०१३ मध्ये तिने स्पेनमधील वॅल्लाडॉलीड येथील स्पर्धेत इटलीच्या कॅमिला रॉझाटेल्लोच्या साथीत पहिले विजेतेपद मिळविले. त्यानंतर २०१४ मध्ये तिने कोरियाच्या डॅबिन किम हिच्या साथीत दिल्लीत सलग दोन स्पर्धांत ही कामगिरी केली होती.

Web Title: sports news itf tennis competition