सिंधू-ओकुहारा लढत यावेळी दुसऱ्याच फेरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा यांच्यात जागतिक स्पर्धा; तसेच कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत मॅरेथॉन अंतिम लढत झाली होती; पण जपान ओपन स्पर्धेच्या ड्रॉनुसार या दोघींत दुसऱ्या फेरीतच लढत होणार आहे. 

जपान ओपन स्पर्धा उद्यापासून (ता. १९) सुरू होईल. पहिल्या दिवशी पात्रता फेरीच्या लढती होतील आणि त्यानंतर मुख्य स्पर्धेस सुरवात होईल. सिंधूची सलामीला लढत मिनात्सू मितानी हिच्याविरुद्ध होईल. 

कोरियन स्पर्धेत मितानीने सिंधूला तीन गेमपर्यंत झुंजवले होते. ही लढत जिंकल्यास सिंधूसमोर ओकुहाराचे आव्हान असू शकेल. ओकुहाराने सलामीची लढत जिंकल्यासच हा सामना होईल. सिंधू आणि ओकुहाराची सध्याची कामगिरी बघितल्यास ही लढत २१ सप्टेंबरला होऊ शकेल. 

अर्थात, या स्पर्धेत भारताची मदार केवळ सिंधूवरच नसेल; तर जागतिक ब्राँझविजेती साईना नेहवाल, दोन सुपर सीरिज जिंकलेला किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी साई प्रणीत, समीर; तसेच सौरभ वर्मा यांच्याकडूनही आशा असतील. 

साईनास दुसऱ्या फेरीत बहुदा कॅरोलिना मरिनचा सामना करावा लागेल. श्रीकांत सलामीलाच तिआन होऊवेई याचे आव्हान असेल. श्रीकांत होऊवेईविरुद्ध यापूर्वीच्या सर्व सहा लढतींत पराजित झाला आहे; तर सौरभ वर्माची सलामीला लढत लीन दानविरुद्ध होईल.

Web Title: sports news japan open badminton competition