बीच कबड्डीत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पुणे - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. आंध्र प्रदेशात गुंटूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राच्या महिलांनी दोन्ही सामने जिंकले, तर पुरुषांना एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

महिला संघाने ‘क’ गटातून पहिल्या सामन्यात तेलंगणाचा ६१-२८ असा धुव्वा अडवला. अंकिता जगताप, श्रद्धा पवार यांचा खेळ निर्णायक ठरला. त्यांना राणी उपहार, माधुरी गवंडी यांची साथ मिळाली. विश्रांतीला २९-११ अशी आघाडी घेऊन त्यांनी सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट केला होता. दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबला असाच आक्रमक खेळ करत विश्रांतीच्या २७-१३ अशा आघाडीनंतर ४९-२१ असे पराभूत केले.

पुरुष संघाला मात्र संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. तरीदेखील त्यांचा बाद फेरीतील प्रवेश सुकर झाला. पहिल्या सामन्यात विश्रांतीच्या २८-३४ अशा पिछाडीनंतरही जोरदार प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्राला कर्नाटकविरुद्ध अखेरीस ४९-५० असा एका गुणाने पराभव पत्करावा लागला. ओमकार जादव, आशिष मोहिते, प्रमोद घुले यांचे प्रयत्न अपुरे पडले. पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राचे खेळाडू जिद्दीने उतरले आणि त्यांनी सेनादलाचे तगडे आव्हान २८-२६ असे परतवून लावले.

Web Title: sports news kabaddi competition