‘विजेतेपदाने जबाबदारी वाढली’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे - राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने या वेळी अकरा वर्षाने विजेतेपद मिळविले ही अभिमानाची बाब असली, तरी महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा मिळविण्याची जबाबदारीदेखील या विजेतेपदाने वाढली आहे, असा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या राज्याच्या खेळाडूंचा अलीकडेच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर भारतीय महिला संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांचाही गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय कार्यक्रमातील स्पर्धा गेल्यावर्षीची असली, तरी ती नव्या कॅलेंडर वर्षात झाली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने नव्या वर्षाची सुरवात विजेतेपदाने केली आता हेच सातत्य पुढे कायम राखण्याचे आव्हान असल्याचे सांगून अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘या विजेतेपदाने महाराष्ट्राचा लौकिक निश्‍चित उंचावला आहे. विजेतेपदाने राज्यातील कबड्डीला नव्याने प्रेरणा मिळेल. यश मिळविण्यापेक्षा ते टिकवणे कठिण असते. त्यामुळेच हे नुसते विजेतेपद नाही, तर जबाबदारी वाढल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे सातत्य राखण्यासाठी मेहनतीपासून दूर पळू नका.’’ 

या वेळी सुनील तटकरे, बाबूराव चांदेरे, किशोर पाटील, शांताराम जाधव, राजू भावसार आदी उपस्थित होते.

Web Title: sports news kabaddi competition ajit pawar