पुणे, उपनगर बाद फेरीत

पुणे, उपनगर बाद फेरीत

मुंबई - पुण्यासह मुंबई शहर, उपनगर आणि कोल्हापूर या पुरुष संघांनी राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. महिलांत पुणे, सातारा, उपनगर, शहर यांनीही आपले बाद फेरीतील स्थान जवळपास निश्‍चित केले. 

‘अ’ गटातून पुण्याने परभणीचा ६५-१४ असा धुव्वा उडविला. अक्षय जाधव, सिद्धू देसाई, वीराज लांडगे, प्रमोद घुले यांचा जोशपूर्ण खेळ या विजयात महत्त्वाचा ठरला. ‘क’ गटात धुळ्याने ठाण्याला चांगलेच झुंजविले. शेवटी ठाण्याने हा सामना ४३-३७ असा खिशात टाकला. महिलांच्या ‘अ’ गटात गतविजेत्या पुण्याने सोलापूरला ६१-२७ असे नमवत सहज बाद फेरी गाठली. स्नेहल शिंदे, सायली केरीपाळे यांच्या नेत्रदीपक खेळाने पुण्याने विश्रांतीला ४९-७ अशी आघाडी घेतली होती. नंतर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना खेळण्याची संधी देत हा विजय साकारला.  ‘ब’ गटात उपनगरने रायगडला ५३-२१ असे पराभूत करीत आगेकूच केली. अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव, पूजा जाधव यांच्या चतुरस्त्र खेळामुळे उपनगरने हा विजय साकारला. ‘क’ गटात मुंबई शहरने औरंगाबादला ४८-६ असे सहज नमवित बाद फेरीतील आपली जागा नक्की केली. ‘ड’ गटात ठाण्याने जालनावर ५१-११ अशी मात केली. मुंबई शहरने रायगडला ३६-२६ नमविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com