सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सोल - भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीतून अशीच कामगिरी केली. मात्र, पी. कश्‍यप आणि बी. साईप्रणित यांना आपले आव्हान गमवावे लागले. 

ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. सिंधू हिने थायलंडच्या निट्‌चॅऑन जिंदापॉल हिचे आव्हान २२-२०, २१-१७ असे सहज परतवून लावले. तिची गाठ आता जागतिक स्पर्धेतील माजी ब्राँझपदक विजेती जपानची मिनात्सु मितानी हिच्याशी होणार आहे. 

हाँग काँग सुपर सीरिज स्पर्धेतील उपविजेता आणि सईद मोदी ग्रॅंड प्रिक्‍स स्पर्धेचा विजेता समीर वर्मा याने हाँग काँगच्या वाँग विंग की व्हिन्सेंट याच्यावर ४१ मिनिटांत २१-१९, २१-१३ असा विजय मिळविला. आता त्याची गाठ कोरियाच्या सोन वॅन हो याच्याशी पडणार आहे. त्याने अन्य एका लढतीत भारताच्याच पी. कश्‍यपर याच्यावर संघर्षपूर्ण विजय मिळविला. तब्बल १ तास १६ मिनिटे रंगलेली लढत सोन वॅन याने २१-१६, १७-२१, २१-१६ अशी जिंकली. 

सिंधू आणि जिंदापॉल यांच्यातील आतापर्यंतच्या लढतीत दोघींनी एकेक विजय मिळविला होता. तिने सिंधूवर गेल्यावर्षी भारतातच सईद मोदी ग्रॅंड प्रिक्‍स स्पर्धेत मात केली होती. पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये जबरदस्त चुरस राहिली होती. जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असणारी जिंदापॉल एकवेळ ९-७, १३-१० अशी आघाडीवर होती. पण, सिंधूने सलग सहा गुणांची कमाई करत १४-१६ अशी आघाडी मिळविली. त्यानंतर जिंदापॉलने अखेरपर्यंत बरोबरी राखण्याचा प्रयत्न केला. पण, सिंधूने संधी न दवडता गेम जिंकली. दुसऱ्या गेमची सुरवात देखील चमकदार होती. सुरवातीला ८-८ अशा बरोबरीनंतर जिंदापॉल १२-९ अशी मागे पडली. पण, पुढे जाऊन तिने १५-१५ अशी बरोबरी राखली. पण त्यानंतर सिंधूने अधिक आक्रमक खेळ करताना वेगवान फटक्‍यांनी जिंदापॉल हिला केवळ दोनच गुण जिंकू दिले आणि सहा गुणांची कमाई करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पुरुष एकेरीत भारताच्या साईप्रणितला तैवानच्या सातव्या मानांकित वॅंग त्झु वेई याचे आव्हान पेलवले नाही. वॅंगने ३९ मिनिटांत २१-१३, २६-२४ असा विजय मिळविला.

Web Title: sports news korea open badminton competition