मनूची पुन्हा सुवर्णक्रांती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

मुंबई - काही दिवसांपूर्वीच सीनियर गटाच्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून क्रांती करणाऱ्या मनू भाकरने ज्युनियर गटाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी ‘शार्प शूटर’ असा बहुमान मिळवणाऱ्या या युवतीने १० मीटर एअर पिस्तूल आणि सांघिक विभागात अशी दोन सुवर्णपदके मिळवली. गौरव राणाने रौप्य आणि अनमोल जैनने ब्राँझपदक जिंकल्यामुळे भारत पदकतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी आला आहे.   भारतीय नेमबाजीतील मनू क्रांती म्हणून मनूच्या यशाकडे पाहिले जात आहे.

मुंबई - काही दिवसांपूर्वीच सीनियर गटाच्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून क्रांती करणाऱ्या मनू भाकरने ज्युनियर गटाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी ‘शार्प शूटर’ असा बहुमान मिळवणाऱ्या या युवतीने १० मीटर एअर पिस्तूल आणि सांघिक विभागात अशी दोन सुवर्णपदके मिळवली. गौरव राणाने रौप्य आणि अनमोल जैनने ब्राँझपदक जिंकल्यामुळे भारत पदकतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी आला आहे.   भारतीय नेमबाजीतील मनू क्रांती म्हणून मनूच्या यशाकडे पाहिले जात आहे. सिडनी येथे सुरू असलेल्या ज्युनियर विश्‍वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल विभागात फिनिक्‍स भरारी घेत तिने सुवर्णवेध घेतला. थायलंडच्या कान्याकोर्न हिरुन्फोएम यासुद्धा १६ वर्षीय युवतीने मनूला काँटें की टक्कर दिली होती. अखेरच्या शॉट्‌समध्ये मनूने बाजी मारली आणि या स्पर्धेतले भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. 

१० मीटरची ही स्पर्धा कमालीची चुरशीची झाली. खरे तर मनूने २.२ गुणांची चांगली आघाडी घेतली होती; परंतु पुढचे सलग सहा शॉट्‌स १० मीटर रिंगच्या बाहेर केले. परिणामी, ती हिरुन्फोएमपेक्षा एक गुणाने मागे पडली आणि त्या वेळी केवळ दोनच शॉट्‌स शिल्लक होते; पण याच शॉट्‌समध्ये मनूने ९.६ आणि ९.८ असा वेध घेतला. या वेळी हिरुन्फोएमने अखेरच्या शॉट्‌समध्ये ७.९ अशी कामगिरी केली होती.

मनूने या प्रकारात एकूण २३५.९ गुणांची कमाई केली, तर पात्रता स्पर्धेत ५७६ गुणांचा विश्‍वविक्रम करणाऱ्या हिरुन्फोएमला २३५.९ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: sports news manu bhakar