फराह अडकला स्वतःच्याच जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मागे राहून शेवटच्या टप्प्यात वेग वाढविण्यात वाकबगार असलेला ग्रेट ब्रिटनचा मो फराह जागतिक मैदानी स्पर्धेतील आपल्या शेवटच्या शर्यतीत स्वतःच्याच डावपेचात अडकला. फराहच्याच डावपेचाचा वापर करून इथिओपियाच्या मुख्तार इद्रीसने फराहच्या सोनेरी कारकिर्दीला शेवटी रौप्यपदकाची किनार दिली. शेवटच्या दोन फेऱ्या शिल्लक असताना फराहने प्रथम ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रीक टेरनन तर शेवटच्या फेरीच्या वेळी इथिओपीयाच्या योमिफ केजेलचा, सेलोमोन बरेगा आणि अमेरिकेच्या पॉल चेलीमो यांच्यासोबत धावण्यास प्राधान्य दिले.

मागे राहून शेवटच्या टप्प्यात वेग वाढविण्यात वाकबगार असलेला ग्रेट ब्रिटनचा मो फराह जागतिक मैदानी स्पर्धेतील आपल्या शेवटच्या शर्यतीत स्वतःच्याच डावपेचात अडकला. फराहच्याच डावपेचाचा वापर करून इथिओपियाच्या मुख्तार इद्रीसने फराहच्या सोनेरी कारकिर्दीला शेवटी रौप्यपदकाची किनार दिली. शेवटच्या दोन फेऱ्या शिल्लक असताना फराहने प्रथम ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रीक टेरनन तर शेवटच्या फेरीच्या वेळी इथिओपीयाच्या योमिफ केजेलचा, सेलोमोन बरेगा आणि अमेरिकेच्या पॉल चेलीमो यांच्यासोबत धावण्यास प्राधान्य दिले. मुख्तार इद्रीसने मात्र शेवटच्या दोनशे मीटरपर्यंत मागे राहणे पसंत केले आणि शेवटी फराहला संधी न देता प्रचंड वेग वाढविला व सुवर्णपदकावर (१३ मि.३२.७९ सेकंद) नाव कोरले. शर्यत संपल्यावर मुख्तारने फराहच्या ‘मोबोट’ पद्धतीने आनंद साजरा केला. फराहच्या रौप्यपदकामुळे (१३ मि.३३.२२ से.) स्टेडियममध्ये असलेले ब्रिटिश पाठीराखे, फराहचा परिवार आणि स्वतः फराह हताश झाला होता.

दवींदर अडखळला
भालाफेकीत दवींदर सिंग अंतिम फेरी गाठून भारतीय क्रीडा प्रेमींच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, ज्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करण्याची वेळ आली, त्या वेळी त्याच्या खांद्याच्या दुखापतीने दगा दिला. तो फक्त ८०.०२ मीटर अंतरावरच भाला फेकू शकला. प्राथमिक फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती त्याने केली असली, तर तो अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवू शकला असता. त्याला १३ स्पर्धकांत १२ वे स्थान मिळाले. गतविजेता केनियाचा ज्युलीयस येगो यापेक्षा एक स्थान वरचे मिळविले, हीच दवींदरसिंगसाठी समाधानाची बाब ठरली. यात जर्मनीच्या जोनास वेटटरने (८९.८९ मीटर) सुवर्णपदक जिंकले. 

सॅलीचे निर्विवाद वर्चस्व
पाच वर्षांपूर्वी सॅलीने लंडनच्याच ऑलिंपिक स्टेडियममध्ये सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक पातळीवरील तिचे हे शेवटचे सुवर्णपदक होते. त्यानंतर यंदा मात्र दृढनिश्‍चय करून दाखल झालेल्या ३१ वर्षीय सॅलीने सुरवातीपासून १०० मीटर हर्डल्स या आवडत्या शर्यतीत कारकिर्दीतील दुसरे विश्‍वविजेतेपद (१२.५९ से.) मिळविले. महिलांच्या रिले शर्यतीत मात्र अमेरिकेने (४१.८२ सें) ग्रेट ब्रिटनचे (४२.१२ से.) आव्हान परतवून लावीत सुवर्ण जिंकले. जमैकाला ब्राँझपदक मिळाले. 

थोडक्यात 
      पाच हजार मीटर शर्यतीत २००९ नंतर इथिओपियाला प्रथमच सुवर्ण. त्यांचे स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सुवर्ण
       दुखातपीनंतर पुनरागमन करणाऱ्या सॅली पिअरसनला जागतिक स्पर्धेत सहा वर्षानंतर सुवर्ण.
       पराभवामुळे फराहची २०११ च्या डेगू (५००० मीटर) स्पर्धेपासून सुरू झालेली विजयी मालिका खंडित.

Web Title: sports news mo farah runner