पुण्यातील गिर्यारोहक माउंट नून मोहिमेत मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे/लेह  - पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद सुभाष टकले  (वय ५०) यांचे माउंट नून मोहिमेदरम्यान कॅम्प ३ वर मृत्यू झाला.   त्यांच्यापश्‍चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री किंवा बुधवारी पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पुणे/लेह  - पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद सुभाष टकले  (वय ५०) यांचे माउंट नून मोहिमेदरम्यान कॅम्प ३ वर मृत्यू झाला.   त्यांच्यापश्‍चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री किंवा बुधवारी पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दिल्लीस्थित ‘अल्पाइन वाँडरर्स’संस्थेकडून टकले, पुण्याचा जितेंद्र गवारे, दिल्लीचा नितीन पांडे व जम्मूचा गुलजार अहमद कारगिल भागातील ७१३५ मीटर उंचीच्या शिखराच्या मोहिमेसाठी जुलैच्या मध्यास रवाना झाले होते. शनिवारी शेवटच्या चढाईच्या वेळी अतिउंचीमुळे दम लागून शरीरातील त्राण गेल्यामुळे टकले यांचा मृत्यू झाला. २८ जुलै रोजी या चौघांनी चार शेर्पा साथीदारांसह चढाईसाठी सुरवात केली. सात हजार मीटर उंचीवर टकले यांची दमछाक झाली. त्या वेळी टकले यांना तेथेच थांबविले व इतरांनी आगेकूच केली. ते परत येईपर्यंत टकले यांची प्रकृती आणखी खालावली. त्या वेळी सर्वांनी निर्णय घेऊन टकले यांना कॅम्प ३ वर पोचवून पुढे हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्‍यू करण्याचे ठरवले. त्यानुसार गवारे त्यांची सोय गवारे ‘बेस कॅम्प’ला परतला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याने मदतीसाठी ‘गिरिप्रेमी’ संस्थेशी संपर्क साधला, तसेच जवळच असलेल्या पानिखेर येथील लष्करी तळावर जाऊन विनंती केली. तोपर्यंत ‘गिरिप्रेमी’ने एक पथक लेहला पाठविले. यात गिर्यारोहक डॉ. सुमित मांदळे व टकले यांचे सहकारी संदीप बंब यांचा समावेश होता. तसेच ‘गिरिप्रेमी’चा दिनेश कोतकर हा दुसऱ्या मोहिमेसाठी लेहलाच असल्याने त्याचीही मदत झाली. त्यांनी लेहमधील ‘व्हाईट मॅजिक ॲडव्हेंचर्स’च्या दहा शेर्पांना पाचारण केले.  दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लष्कराचे हेलिकॉप्टर तातडीने उपलब्ध करून दिले. कारगिल व लेह येथील लष्करी अधिकाऱ्यांनी तातडीने सहकार्य केले. दुर्दैवाने हेलिकॉप्टर रेस्क्‍यू टीम ‘कॅम्प ३’ वर पोचेपर्यंत टकले यांचा मृत्यू झाला होता. टकले यांच्या अकाली मृत्युमुळे गिरिप्रेमीवर मोठा आघात झाला आहे.

Web Title: sports news Mountaineer

टॅग्स