मोसमाअखेरच्या क्रमवारीत नदालच अव्वल राहणार

पीटीआय
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पॅरिस - स्पेनच्या रॅफेल नदालने मोसमाअखेरच्या एटीपी क्रमवारीतील अव्वल स्थान नक्की केले. त्याने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाच्या चुंग हिऑनला ७-५, ६-३ असे हरविले. नदालचा नजीकचा प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याने पुरेशा तंदुरुस्तीअभावी या स्पर्धेतून माघार घेतली. गेल्या आठवड्यात फेडररने बॅसलमधील स्पर्धा जिंकली. नदाल त्या स्पर्धेत खेळला नव्हता. फेडररने विजेतेपदासह पिछाडी कमी केली होती. तो पॅरिसमध्ये खेळला असता तर चुरस वाढली असती. 

Web Title: sports news nadal tennis