महिला गटात रेल्वे-छत्तीसगड अंतिम झुंज

मुकुंद धस
बुधवार, 24 जानेवारी 2018

चेन्नई - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात रेल्वे आणि छत्तीसगड यांच्यात विजेतेपदाची लढत होईल. त्याचवेळी महाराष्ट्र संघ पाचव्या क्रमांकासाठी यजमान तमिळनाडूशी झुंजेल. 

महिला गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत विजेत्या संघांना संघर्ष करावा लागला. रेल्वेने गतविजेत्या केरळाचे आव्हान ७६-६३ असे सात गुणांनी परतवून लावले. छत्तीसगडने कर्नाटकावर ७९-७८ असा एका गुणाने निसटता विजय मिळविला. 

कर्नाटक संघाचे सदोष ‘थ्रो’च त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. सामना संपण्यास चार सेकंद असताना ७९-७६ अशा स्थितीत अनुभवी सीमा अखेरचा फ्री थ्रो अचूक करू शकली नाही. त्यानंतर कर्नाटकची कर्णधार तीन गुणांच्या प्रयत्नात फाऊल करून बसली. त्या वेळी मिळालेल्या तीन फ्री थ्रोवरदेखील ती केवळ दोनच गुण मिळवू शकली.

महाराष्ट्राच्या महिलांनी ५ ते ८ स्थानासाठी झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशचे आव्हान ८५-७१ असे मोडून काढले. उद्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात ५व्या स्थानासाठी त्यांची गाठ तमिळनाडूशी पडेल. त्यांनी दिल्लीला ८६-६६ असे पराभूत केले.

Web Title: sports news national basketball competition