राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांचा विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी विजयी सलामी दिली. स्पर्धेत ‘क’ गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने केरळाचा प्रतिकार ४५-३९ असा मोडून काढला. विश्रांतीला महाराष्ट्र २१-२४ असा पिछाडीवर होता. ओंकार जाधव, कर्णधार दादासाहेब आवाड यांनी उत्तरार्धात दमदार चढाया करून महाराष्ट्राला गुण मिळवून दिले. प्रमोद घुले आणि आशिष मोहिते यांनी अचूक पकडी करून संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्राला आता गटात सेनादल, कर्नाटक संघांचा प्रतिकार परतवून लावायचा आहे. महाराष्ट्राच्या महिलांचा संघ ही ‘ख’ गटात असून, पंजाब, तेलंगणा हे गटातील अन्य संघ आहेत.

Web Title: sports news national beach kabaddi competition