हरित, युवराज, सार्थक राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेते

हरित, युवराज, सार्थक राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेते

कोची - टीव्हीएस रेसिंगच्या हरित नोह याने एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील पहिल्या फेरीत दोन्ही मोटो जिंकत सर्वोत्तम रायडरचा किताब मिळविला. पुण्याच्या युवराज कोंडेदेशमुखने ज्युनियर एसएक्‍स १, तर सार्थक चव्हाणने ज्युनियर एसएक्‍स २ गटात विजेतेपद मिळविले. फॉरेन ओपन गटात पहिल्या मोटोत ऋग्वेद बारगुजे, तर दुसऱ्या मोटोत युवराजने तिसरा क्रमांक मिळविला. पुण्याच्या करण कारलेनेही दुसऱ्या क्रमांकासह करंडक मिळविला. 

कोचीमध्ये पीट्‌स सुपर संडे या रेसिंग महोत्सवात ही फेरी झाली. पुणेस्थित गॉडस्पीड रेसिंग मालिकेचे प्रवर्तक आहे. हरितसमोर त्याच्याप्रमाणेच केरळच्या सी. डी. जीननचे आव्हान होते. दुसऱ्या मोटोत जीननने आघाडीसुद्धा घेतली होती, पण तो बाईकवरून पडला, तर हरित ट्रॅक सोडून बाहेर गेला. त्यातच हरितच्या बाईकचे फायरिंग बिघडले होते. यानंतरही त्याने दुसरा मोटो जिंकत सर्वोत्तम रायडरचा किताब नक्की केला.

हरितने सांगितले की, पहिल्या मोटोपूर्वी माझी रेसबाईक बिघडली. त्यामुळे मला स्पेअर बाईक चालवावी लागली. मी सुरवातीला आठव्या क्रमांकावर होतो, पण नंतर पिछाडी कमी केली. दुसऱ्या मोटोला मी बाईकमध्ये पॉवर नसूनही कॉर्नर शक्‍य तितक्‍या वेगाने घेतले.

गतवर्षी एकूण क्रमवारीत तिसरा आलेल्या ऋग्वेदची दुसऱ्या मोटोत पहिल्याच कॉर्नरला साईजीतशी धडक झाली. त्यानंतरही त्याने चौथा क्रमांक मिळविला, पण त्याचा पोडियम थोडक्‍यात हुकला. ज्युनियर एसएक्‍स २ गटात सार्थकपाठोपाठ कोल्हापूरचा जितेंद्र संगवे दुसरा, तर साताऱ्याचा इक्षण शानभाग तिसरा आला.

गॉडस्पीडचे संस्थापक प्रमुख श्‍याम कोठारी यांनी सांगितले की, या महोत्सवाला रस्त्याच्या दुतर्फा नुसते पार्किंग सुमारे दोन किलोमीटर होते. सुमारे एक लाख रेसिंगशौकीन उपस्थित होते. बाईकच्या सुपरक्रॉस, तर कारच्या ऑटोक्रॉसशिवाय सुपरकार, सुपरबाईकचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा शॉन वेब आणि चिलीचा गॅब्रिएल व्हिलेगास यांच्या फ्रीस्टाईल स्टंटला जोरदार प्रतिसाद मिळाला. या परिसरात असे स्टंट प्रथमच झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com