विजेतेपद खूप स्पेशल तसेच मोलाचेही - सिंधू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई / सोल - कोरिया सुपर सीरिज विजेतेपद अनेक अर्थाने सुखावणारे, असे पी. व्ही. सिंधूने सांगितले. जागतिक विजेतेपदाच्या अंतिम लढतीतील पराभवाचा या सामन्याच्या वेळी विचार नव्हता, असे सांगतानाच तिने काही क्षणांतच ती लढत विचारात घेऊन खेळल्याचे मान्य केले. 

हे विजेतेपद माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, तसेच महत्त्वाचेही आहे. हे यश अनेक अर्थाने सुखावणारे आहे. दुसऱ्या गेममध्ये शटलवर नियंत्रणच राखता येत नव्हते. तिने खूप मोठ्या फरकाने हा गेम जिंकला होता. तिसऱ्या गेममध्ये तिने चांगला प्रतिकार केला होता. या परिस्थितीत मी जिंकले, हे मला सुखावणारे आहे, असे सिंधूने सांगितले.  अंतिम लढतीबाबत सिंधू म्हणाली, जागतिक स्पर्धेनंतर आम्ही पुन्हा अंतिम लढत खेळत होतो. दुसऱ्या गेममध्ये शटलवरील नियंत्रणच गमावले होते. तिसऱ्या गेममध्ये तर प्रत्येक गुण महत्त्वाचा झाला. तिने मोठी पिछाडी भरून काढली होती. ११-५ नंतर तर कोणीही शटल सोडण्यास तयार नव्हते. प्रत्येक गुणासाठी दीर्घ रॅली सुरू होती. हे तर जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीसारखेच झाले.

ग्लास्गोतील पराभवानंतर आक्रमणाबाबत चर्चा केली होती. त्याकडे जरा लक्ष दिले होते. जागतिक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढल्याचे समाधान नाही; पण ओकुहाराविरुद्ध तिने खडतर लढत जिंकली याचा आनंद नक्कीच आहे. 
- पुल्लेला गोपीचंद, भारतीय मार्गदर्शक

Web Title: sports news p. v. sindhu talking

टॅग्स