अकमलला ‘पीसीबी’ने करार नाकारला

पीटीआय
गुरुवार, 13 जुलै 2017

कराची - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नव्या करारपद्धतीतून उमर अकमलला वगळले आहे. तंदुरुस्ती राखण्यात तो अपयशी ठरल्याने त्याला चॅंपियन्स करंडक स्पर्धेपासून संघातून वगळण्यात आले. त्याचबरोबर निवृत्ती घेतलेल्या मिस्बा उल हक आणि युनूस खान यांनाही करारपद्धतीतून वगळण्यात आले. एकूण ३६ क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात आले असून, त्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा चार श्रेणींत विभागणी करण्यात आली आहे. यात अझर अली, महंमद हफिज, शोएब मलिक, सर्फराज अहमद, यासिर शाह, महंमद अमीर या सहाच क्रिकेटपटूंना ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. ‘ब’ श्रेणीत चार, ‘क’ श्रेणीत ११; तर ‘ड’ श्रेणीत १४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

Web Title: sports news pakistan umar akmal