पंकजची आगेकूच कायम

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

यांगून (म्यानमार) - भारताच्या पंकज अडवानीने १७ व्या आशियाई बिलियर्डस स्पर्धेत म्यानमारच्या पौक सा याला ४-१ असे हरवून गटसाखळीत दुसरा विजय मिळविला. पहिल्या फ्रेममध्ये त्याने १०२ गुणांचा शतकी ब्रेक मिळविला. पौकने ८४ गुणांच्या ब्रेकसह बरोबरी साधली, पण त्यानंतर पंकजने ९८ व ८० गुणांचे ब्रेक नोंदविले. इतर स्पर्धकांमध्ये विद्या पिल्लईने इराणच्या अक्राम मोहम्मदीला २-१, तर अमी कमानीने इराणच्या परिसा दर्वीश्‍वांदला २-० असे हरविले.

Web Title: sports news pankaj advani india

टॅग्स