प्रो कबड्डी लीगमध्ये  गुजरात-हरियाना बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

हैदराबाद - हरियानाकडून सर्वाधिक चढाईचे सात गुण घेणाऱ्या विकास खंडोलाने सामन्यातील अखेरच्या चढाईत सावध पवित्रा घेतला, त्यामुळे प्रो-कबड्डी लीगमधील हरियाना-गुजरात लढत २७-२७ अशी बरोबरीत सुटली. या मोसमातील पहिला टप्पा संपण्यापूर्वीच पहिल्या बरोबरीची नोंद झाली. हरियानाने गुजरातचे प्रमुख बचावपटू फाझल अत्राचली आणि अबॉझार मेघानी यांना बचावातील गुणांपासून रोखले. त्यामुळे गुजरात आणि हरियानाची पकडीच्या गुणात ९-९ बरोबरी झाली. फाझल आणि अबॉझार यांच्या तीनच पकडी यशस्वी झाल्या.

परवेश भैसवाल आणि सुनील कुमारचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातचा बदली आक्रमक महेंद्र राजपूत सर्वात यशस्वी ठरला. सुरेंद्र नाडाचे पकडीतील सात गुण आणि विकासचे चढाईतील सात गुण यांच्याबरोबरच बदली आक्रमक सुरजित सिंगने सहा गुण घेत हरियानाचे आव्हान कायम ठेवले होते; पण त्यांचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले. गुजरातने विश्रांतीस ११-८ अशी आघाडी घेतली होती; पण ती राखण्यात ते अपयशी ठरले. प्रो-कबड्डीच्या पुनरागमनाच्या पहिल्याच लढतीत मनिंदरने केलेल्या जोरदार लढतीच्या जोरावर पाचव्या मोसमात बंगाल वॉरियर्सने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या तेलगू टायटन्सला ३०-२४ असा धक्का दिला. पूर्वार्धात मनिंदर आणि जान कुन ली यांच्या खोलवर चढायांनी मिळविलेली आघाडी बंगालने नियोजनबद्ध खेळ करत उत्तरार्धातही कायम राखत विजय मिळविला. तेलगूकडून राहुलला आलेले अपयश त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. विकास तोमरने चढाईत नऊ गुण मिळवताना ते पुसून काढण्याचा प्रयत्न केला. मनिंदर आणि जान कुन ली यांच्या चढाईत बंगालने मिळविलेले एकत्रित १९ गुणच निर्णायक ठरले. मनिंदरने ११; तर जानने ८ गुण नोंदवले.

Web Title: sports news pro kabaddi