हरियाना स्टीलर्स ठरले ‘जायंट किलर’

पीटीआय
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

नागपूर - हरियाना स्टीलर्स संघाने गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सचा ३२-२० असा १२ गुणांनी पराभव करून प्रो-कबड्‌डी लीग स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात बंगळूर बुल्सला २१-२१ गुणांनी बरोबरीत रोखून तेलगू टायटन्सने पराभवाची मालिका खंडित केली. 

नागपूर - हरियाना स्टीलर्स संघाने गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सचा ३२-२० असा १२ गुणांनी पराभव करून प्रो-कबड्‌डी लीग स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात बंगळूर बुल्सला २१-२१ गुणांनी बरोबरीत रोखून तेलगू टायटन्सने पराभवाची मालिका खंडित केली. 

येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहात हरियानाकडून विकास कंडोलच्या झालेल्या आक्रमक चढाया गुण वसूल करत असल्या, तरी मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या कोपरारक्षक जोडीचा बचावच त्यांच्या विजयात निर्णायक ठरला. विजातील ३२ गुणांपैकी १३ गुणांचा वाटा या जोडगोळीचा होता. विकास कंडोलाच्या सहा गुणांची त्यांना साथ मिळाली. सुरजितसिंग आणि वझीरसिंग यांनीदेखील आपला वाटा उचलला.

गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सकडून सचिनने सर्वाधिक आठ गुण नोंदवून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महेंद्र राजपूतने पाच व अबोझार मिघानीने तीन गुणांची नोंद केली. मात्र, कर्णधार सुकेश हेगडे व फजल अत्राचली यांना आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. या दोन्ही खेळाडूंना या सामन्यात एकही गुण नोंदवता आला नाही.  

तेलगूला दिलासा
पहिल्या विजयानंतर सलग पाच पराभव पत्करावे लागलेल्या तेलगू टायटन्स संघाला बंगळूरला २१-२१ असे बरोबरीत रोखून पराभवाची मालिका खंडित करण्याचे समाधान लाभले. रोहित चौधरी या एकखांबी तंबूवर उभा असलेला तेलगू संघ आजही त्याच्यामुळेच बंगळूरला आव्हान देऊ शकला. बंगळूरला मात्र पुन्हा एकदा (२०-१५) आघाडीवर राहिल्यानंतरही मोठ्या विजयाला गवसणी घालता आली नाही. अखेरच्या तीन निमिटांत तेलगू संघाने सलग पाच गुण मिळवून सामना बरोबरीत राखला. बंगलूरकडूनदेखील कर्णधार रोहित कुमारच चमकला. त्याने पाच गुण नोंदवले. तेलगूकडून रोहितने सर्वाधिक आठ गुणांची नोंद केली.

Web Title: sports news pro kabaddi