जयपूरने केली स्वतःचीच पकड

संजय घारपुरे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - राहुल चौधरीच्या झंझावातास भरभक्कम बचावाची साथ लाभली आणि त्याचवेळी जयपूरचे जसवीर सिंग आणि मनजित चिल्लर अपयशी ठरले. त्यामुळे प्रो-कबड्डीत तेलुगुने आशा कायम राखताना ४१-३४ असा विजय मिळविला. 

नवी दिल्ली - राहुल चौधरीच्या झंझावातास भरभक्कम बचावाची साथ लाभली आणि त्याचवेळी जयपूरचे जसवीर सिंग आणि मनजित चिल्लर अपयशी ठरले. त्यामुळे प्रो-कबड्डीत तेलुगुने आशा कायम राखताना ४१-३४ असा विजय मिळविला. 

मनजित चिल्लर संघात असूनही जयपूरचा बचावात दम वाटत नव्हता, तेविसाव्या मिनिटास आर एलेंगेश्वरनची पकड  होईपर्यंत जयपूरला पकडीचा एकही गुण नव्हता. मनजित कोर्टवर असल्याचे जाणवतही नव्हते, तर सोमजीत शेखरच्या चुका होत होत्या. पवनकुमार सोडल्यास त्यांचे आक्रमणही फार काम करीत  नव्हते. तेलुगुचे दोन बचावपटू त्याची पकड करण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या कोर्टवर गेले नसते तर अधिकच गुण आटले असते. जयपूर संपूर्ण सामन्यात बचावाचे तीनच गुण मिळवत असताना तेलुगुचा विशाल भारद्वाज पकडीत हाय फाईव्ह करीत होता, हाच दोन संघांतील फरक ठरला. तेलुगुच्या आक्रमणातील २८-२५ वर्चस्वापेक्षा पकडीतील ११-३ वर्चस्वाने लढतीचा निर्णय केला. 
राहुल चौधरीने पूर्वार्धातच सुपर टेन केले होते, तर नीलेश साळुंके त्याला योग्य साथ देत होता. त्यांचे कॉर्नरही प्रभावी ठरत होते. 

मात्र प्रो-कबड्डीत सातत्याने दिसत आहे तेच पुन्हा दिसले. सुरवातीस एकतर्फी आघाडी घेणारा संघ क्वचितच जोश राखत आहे. तेलुगुची २३  व्या मिनिटास असलेली २६-१२ आघाडी लोण स्वीकारल्याने दहा मिनिटे असेपर्यंत ३१-२५ कमी झाली. मात्र, त्यानंतर तेलुगुने शांतपणे खेळ करीत जयपूर आपल्यावर दडपण आणणार नाही, ही काळजी घेत सहा गुणांनी सहज विजय मिळविला.

Web Title: sports news Pro Kabaddi