अखेरच्या चढाईत बंगळूर-तेलुगू बरोबरी

शैलेश नागवेकर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

रांची - प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात आणखी एक सामना अखेरच्या क्षणी बरोबरीत सुटला. खरे तर बंगळूरला विजयाची संधी होती. चार गुणांची आघाडी त्यांना टिकवता आली नाही आणि तेलुगूने आव्हानातील धगधग कायम राखताना २६-२६ अशी बरोबरी साधली.

पाटणाकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या तेलुगूसाठी ही बरोबरीही विजयाऐवढीच मोलाची होती. सातत्याने पिछाडीवर राहणाऱ्या राहुल चौधरीच्या या संघाने अखेरच्या दोन मिनिटात वैचारिक खेळ केला. त्यातच त्यांची सरशी झाली.

राहुल चौधरीविरुद्ध रोहित कुमार या दिग्गजांमधील हा सामना होता. या दोघांनीही प्रत्येकी आठ गुण मिळवले; परंतु रोहितच्या झालेल्या चार सुपर टॅकल बंगळूरसाठी मारक ठरल्या. यातील चौथी सुपर टॅकल अखेरच्या सव्वा मिनिटात झाली आणि तेलुगूने २४-२६ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर राहुलने चढाईत गुण घेतला. बंगळूरसाठी सामन्यातील अखेरची चढाई डू ऑर डाय अशी होती. गतमोसमात जयपूरकडून खेळताना डू ऑर डाय चढाईतील वाक्‌बगार असलेल्या अजयला गुण मिळवता आला नाही. तो बाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. 

पाटणाची सरशी
वेगवान झालेल्या उत्तरार्धातील खेळात लोण चढवण्याच्या शर्यतीत पाटणाने पुन्हा एकदा प्रदीप नरवालच्या चौफेर चढायांनी बाजी मारली. त्यांनी यूपी योद्धाजचा ४५-४२ असा पराभव केला. मध्यंतराला सामना २०-२० असा बरोबरीत होता. उत्तरार्धात एकामागून एक तीन लोण नोंदले गेले. यातील दोन लोण यूपी संघावर आणि एक पाटणा संघावर बसला. या सगळ्या वाटचालीचा शिलेदार अर्थातच प्रदीप नरवाल ठरला. स्पर्धेत आणखी एकदा सुपर टेन ठरलेल्या प्रदीपने आज डोक्‍याला मार लागूनही २३ चढायांत १५ गुणांची नोंद केली. यूपीच्या नितीन तोमरने २४ चढायांत १४ गुण नोंदवले.

Web Title: sports news pro-kabaddi competition