प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात पुण्याचे ‘प्ले-ऑफ’ स्थान निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

जयपूर - प्रो-कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या मोसमात पुणेरी पलटण संघाने आपले ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्‍चित केले. गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सनेही आपली आगेकूच कायम राखली.

जयपूर - प्रो-कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या मोसमात पुणेरी पलटण संघाने आपले ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्‍चित केले. गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सनेही आपली आगेकूच कायम राखली.

जयपूरच्या टप्प्यात पुणे  संघाने रविवारी यजमान जयपूर पिंक पॅंथर्सचा ३८-३० असा पराभव केला. उत्तरार्धातील नितीन रावलच्या यशस्वी चढायांच्या जोरावर जयपूरने आव्हान टिकविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बचावात (१८-७) आलेले अपयश चांगलेच महागात पडले. पुणे संघाकडून राजेश मोंडल आणि दीपक हुडा यांचे चढायातील गुण अधिक असले, तरी पुढील सामन्यांच्या दृष्टीने पकडीत गिरीश एर्नाकने मिळविलेले यश त्यांना नक्कीच सुखावणारे ठरले. त्याने पाच गुण मिळविले. पुणे संघाला आपल्या घरच्या मैदानावर अजून खेळायचे असल्याने या विजयामुळे त्यांचे तिसरे स्थान कायम राहणार हे निश्‍चित झाले.

त्यापूर्वी आजच्या पहिल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सने आपले वर्चस्व सिद्ध करत रविवारी पाटणा पायरट्‌स संघाला ३३-२९ असे रोखले. फझल अत्राचली, मेघनानी यांच्या पकडीबरोबरच सचिन, महेंद्र राजपूतच्या चढाया निर्णायक ठरल्या. दुसऱ्या सामन्यात पुणे संघाने प्ले-ऑफमधील स्थान भक्कम करताना यजमान जयपूरचा ३८-३० असा पराभव केला.

Web Title: sports news pro-kabaddi competition