संघटनेत महिलांना मिळणार आरक्षण

Kabaddi
Kabaddi

पुणे - पुणे जिल्हा कबड्डी संघटनेमध्ये यापुढे महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. देशातील बहुविध खेळाच्या संघटनेत महिलांना स्थान देण्याचा निर्णय घेणारी पुणे जिल्हा कबड्डी संघटना पहिली संघटना ठरली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भविष्यात अन्य संघटनाही असा निर्णय घेऊ शकतील अशी आशा क्रीडा वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे. 

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेची यापूर्वी तहकूब करण्यात आलेली वार्षिक सभा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने पार पडली तेव्हा महिलांना स्थान मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर राहिला. बैठकीत अपेक्षितपणे हा मुद्दा चर्चेत आल्यावर महेश लांडगे यांनी ठरावाच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्याला कुठलाच विरोध न होता हा ठराव मंजूर करण्यात आला.

बैठकीत संघटनेच्या निवडप्रक्रियेवरही जोरदार चर्चा पार पडली. सदस्यांमधून अनेक आक्षेप घेतले गेले. पण, त्यावर एकाही   पदाधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता न आल्याने अध्यक्षांनी निवडप्रक्रियेची नव्याने नियमावली तयार करण्याच्या सूचना दिल्या.

घटनाही बदलणार
या बैठकीत नव्याने घटना तयार करण्याच्याही सूचना अध्यक्षांनी दिल्या. यासाठी मधुकर नलावडे, शांताराम जाधव, बाबूराव चांदेरे, शंकुतला खटावकर, शिल्पा भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे.

२९ एप्रिलला निवडणूक
त्याचबरोबर पुणे जिल्हा संघटनेची निवडणूक २९ एप्रिल रोजी घेण्याचेही निश्‍चित करण्यात आले. यात झालेला बदल म्हणजे कुठलाही वैयक्तिक निर्णय न होता पदाधिकारी, नियामक मंडळ, स्वीकृत सदस्य यांची अंतिम निवड करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले.

असे असेल महिलांना स्थान
18 - पुणे महापालिका (चार महिला) यातही तीन राष्ट्रीय, एक स्थानिक खेळाडू
6 - पिंपरी-चिंचवड (१ महिला खेळाडू)
6 - पुणे ग्रामीण (१महिला खेळाडू)
9 - नियामक मंडळ (१ राष्ट्रीय खेळाडू)
5 - स्वीकृत सदस्य (१ महिला पंच)
4 - आजीव सदस्य (१महिला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com