व्हॅलेंसियाविरुद्ध रेयाल माद्रिदचा पराभव टळला

पीटीआय
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

माद्रिद - स्पॅनिश लीग सुरू होण्याअगोदर दोन विजेतेपदांचा धडाका लावणाऱ्या रेयाल माद्रिदची ला लीगा स्पर्धेत पराभवाच्या नामुष्कीतून सुटका झाली. अखेरच्या क्षणी मार्को असेन्सिओने केलेल्या गोलाच्या जोरावर त्यांना व्हॅलेंसियाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

या बरोबरीमुळे रेयालची मे महिन्यापासून सुरू असलेली सलग आठ विजयांची मालिका खंडित झाली. तसेच ला लीगामध्ये आघाडीवर असलेल्या बार्सिलोनापेक्षा ते दोन गुणांनी मागे पडले आहेत. 

निकालाबाबत मी समाधानी असणार नाही; परंतु आमची कामगिरी चांगली झाली आणि त्यात अजून सुधारणा होणे अपेक्षित आहे, प्रत्येक सामन्यात तुम्ही जिंकू शकत नाही, यालाच फुटबॉल म्हणतात. विजयाचे दोन गुण गमावले असले, तरी खेळाडूंवर माझा विश्‍वास आहे, असे मत रेयाल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी मांडले. 

व्हॅलेंसियासाठी गेली दोन वर्षे निराशाजनक ठरलेली आहेत. त्यांना सलग दोनदा १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे; परंतु यंदा नवे प्रशिक्षक मार्सेलिनो गार्यिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीलाच गतविजेत्यांना रोखण्याची कामगिरी केली. 

हा सामना आमच्यासाठी प्रेक्षणीय होता. बरोबरीही आमच्यासाठी महत्त्वाची होती. वास्तविक पाहता दोघांनाही विजयाची संधी होती. आमच्या प्रेक्षकांना आपल्या खेळाडूंचा अभिमान वाटेल. या खेळावरून आम्ही कशी तयारी करत आहोत आणि पुढे कशी कामगिरी करणार आहोत, याची प्रचिती येईल, असे मार्सिलिनो यांनी सांगितले. पाच सामन्यांची बंदी असल्यामुळे रोनाल्डोशिवाय रेआलला मैदानात उतरावे लागले. कर्णधार सेरगी रामोसही बंदीमुळे खेळू शकला नाही. याचा परिणाम रेयालच्या कामगिरीवर झाला.  

Web Title: sports news Real Madrid