साईना नेहवालची विजयी सलामी

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

बॅंकॉक - साईना नेहवालने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. द्वितीय मानांकन असलेल्या साईनाने स्लोव्हाकियाच्या मार्टिना रेपीस्कावर २१-५, २१-१० अशी मात केली. साईनाने २५ मिनिटांतच सामना खिशात टाकला. बी. साईप्रणित आणि सौरभ वर्मा यांनी तिसरी फेरी गाठली.

तिसरे मानांकन असलेल्या साईप्रणितने मलेशियाच्या आर. साथैष्ठारन याला २१-१५स २१-१३ असे हरविले. आधीच्या फेरीत त्याचा इंडोनेशियन प्रतिस्पर्धी नॅथानीएल एर्नेस्टान सुलीस्त्यो याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्या वेळी साईप्रणित २१-१०, १८-९ असा आघाडीवर होता.

सौरभने आनंद पवारचे आव्हान २१-१७, २०-२२, २१-१४ असे परतावून लावले. सौरभला १२वे मानांकन आहे. पहिल्या फेरीत त्याने इंडोनेशियाच्या हॉवर्ड ख्रिस्तेव्हेन याला २१-१५, २१-१३ असे हरविले होते. आनंदने पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या चॅन यिन चॅकला २२-२०, २१-१२ असे हरविले होते. महिला एकेरीस साईउत्तेजिता राव हिने झुंजार विजय मिळविला. इंडोनेशियाच्या जेसिका मुल्जाती हिला तिने पहिल्या फेरीत १३-२१, २४-२२, २७ -२५ असे हरविले. 

पी. कश्‍यपला १२ तासांपेक्षा कमी वेळात दोन सामने खेळावे लागले. त्याने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या मिलान द्रात्वाला २१-६, २१-१४ असे हरविले होते. दुसऱ्या फेरीत द्वितीय मानांकित जर्मनीच्या मार्क झ्वीब्लर याच्याकडून तो १४-२१, १८-२१ असे हरला.

इतर निकाल (पहिली फेरी) महिला एकेरी ः रेश्‍मा कार्तिक पपाभूत वि. सुसांतो युलिया सोसेफीन (इंडोनेशिया) १४-२१, १२-२१. ऋत्विका शिवानी गड्डे पराभूत वि. स्री फात्मावती १८-२१, ११-२१. महिला दुहेरी मेघना जक्कमपुडी-पुर्विशा एस. राम पराभूत वि. तानिया ओक्तावियानी कुसुमाह-निसाक पुजी लेस्तारी १०-२१, १८-२१.

मिश्र दुहेरी ः प्राजक्ता सावंत (भारत)-योगेंद्रन कृष्णन (मलेशिया) पराभूत वि. चॅलोम्पॉन चॅरोएनकितामोर्मन-चॅसीनी कोरेपॅप (थायलंड) १३-२१, १२-२१. फ्रान्सिस अल्विन-तरुण कोना पराभूत वि. याँग काई टेरी ही-किआन हिआन लोह (सिंगापूर) ९-२१, १८-२१. 

पुरुष एकेरी ः श्रीयांश जैस्वाल पराभूत वि. सुप्पान्यू अविहिंगसानोन (थायलंड) ९-२१, १८-२१. शुभंकर डे पराभूत वि. जॅरेन लिव (मलेशिया) २१-१०, १५-२१, १९-२१. 

Web Title: sports news Saina Nehwal badminton