संजीवनी जाधवने घडविला इतिहास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - चीनमधील गुयांग येथे गुरुवारी झालेल्या १४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेच्या महिला गटात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली. 

नागपूर - चीनमधील गुयांग येथे गुरुवारी झालेल्या १४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेच्या महिला गटात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली. 

भारताने सांघिक महिला ब्राँझपदकही जिंकता आले. इतर संघांनी निराशा केली. नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने शर्यत २८ मिनिटे १९ सेकंदांत पूर्ण केली. गेल्या नऊ महिन्यांतील हे तिचे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक होय. भुवनेश्‍वरला आशियाई स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझ, तर सप्टेंबर महिन्यात तुर्कमेनिस्तानात आशियाई मार्शल आर्ट व इनडोअर स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्य अशी कामगिरी तिने केली होती. यंदा फेब्रुवारीत इराणमधील आशियाई इनडोअर स्पर्धेत मात्र ती सहभागी झाली नव्हती. या स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी झालेल्या पुण्याच्या स्वाती गाढवेने ११वे (३०.१८ से.), तर रेल्वेच्या जुमा खातूनने १४ वे स्थान मिळविले. या तिघींमुळे भारताला सांघिक ब्राँझ मिळाले. रिओ ऑलिंपिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसची अंतिम फेरी गाठलेल्या ललिता बाबरला १५ व्या स्थानावर (३२.५३ से.) समाधान मानावे लागले.

मुलींच्या सहा किलोमीटर शर्यतीत संजीवनीची सरावातील सहकारी पूनम सोनुने या स्पर्धेत प्रथमच सहभागी झाली होती. तिने सहावा क्रमांक मिळविताना २२ मिनिटे ४५ सेकंदांची वेळ दिली. पुरुषांच्या १२ किलोमीटर शर्यतीत भारतीय संघाला सांघिक प्रकारात चौथे स्थान मिळाले.

इतर निकाल : मुली :  ६ किमी - पूनम सोनुने (सहावी) २२.४५ से. पुरुष : १२ किमी सांघिक चौथे स्थान

 आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताला १९९१ पासून यापूर्वी फक्त चार वैयक्तिक पदके
 १९९३ (जाकार्ता) स्पर्धेत दिनेश कुमारला १२ किमी शर्यतीत रौप्य
 २००७ (अम्मान) स्पर्धेत सुरेंद्रा सिंगला १२ किमी शर्यतीत रौप्य
 याच स्पर्धेत २० वर्षांखालील मुलींच्या ६ किमी शर्यतीत नागपूरच्या मोनिका आणि रोहिणी या राऊत भगिनींना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य

Web Title: sports news sanjeevani jadhav nagpur