‘आँटी’ व्हिनसचा ‘सुपर मॉम’ सेरेनावर विजय

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विल्यम्स भगिनींमधील बहुचर्चित लढतीत व्हिनसने सेरेनावर दोन सेटमध्ये ६-३, ६-४ अशी मात केली. प्रेक्षकांनी दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. मुलीच्या जन्मानंतर पुनरागमन केलेल्या सेरेनाची ही ‘टूर’वरील पहिलीच स्पर्धा होती.

स्टेडियमवर आल्यानंतर या दोघी ‘गोल्फ कार्ट’मधून ‘टनेल’पर्यंत गेल्या. त्यानंतर त्या कोर्टवर आल्या तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत त्यांना प्रोत्साहन दिले. या लढतीला सुमारे दहा हजार चाहते उपस्थित होते. यात आजघडीची रुमानियाची अव्वल खेळाडू सिमोना हालेप हिचाही समावेश होता.

३६ वर्षीय सेरेनाने मुलीच्या जन्मानंतर १५ महिने ब्रेक घेतला. त्यानंतर पहिलीच स्पर्धा खेळताना तिचे फूटवर्क काहीसे संथ होते. ३७ वर्षीय व्हिनसने दुसऱ्या ‘मॅच पॉइंट’वर विजय साकार केला. त्यावेळी सेरेनाचा फोरहॅंड बाहेर गेला. हा सामना एक तास २६ मिनिटे चालला.

व्हिनसला आठवे मानांकन आहे. तिने सहा ‘एस’ मारले, पण आठ ‘डबल फॉल्ट’ झाल्या. सेरेनाने चार ‘एस’ मारले. तिची सर्व्हिस चार वेळा खंडित झाली.

मुलीला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करताना मला आणखी बरीच मजल मारावी लागेल. ते सोपे नसेल. ही स्पर्धा निश्‍चितच सोपी नव्हती. रॅकेटने शॉट मारताना स्विंग साधण्यासाठी आणि फॉर्म गवसण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. एरवी सराव करणे वेगळे असते. सामना खेळताना वेगळेच समीकरण लागू होते. थोडे दडपण साहजिकच येते. सर्वोत्तम खेळ करूनही हरले असे म्हणण्याची ही वेळ नाही हे चांगलेच आहे. याचे कारण मला सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. प्रत्येक स्पर्धेत मागील वेळच्या तुलनेत कामगिरी उंचावणे इतकेच मला करावे लागेल. मला पिछाडीवर पडायचे नाही.
- सेरेना विल्यम्स

दृष्टिक्षेपात
 विल्यम्स भगिनींमधील २९ वी लढत
 व्हिनसचा १२ वा विजय
 २०१४ नंतर व्हिनस प्रथमच विजयी
 गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेनाची सरशी
 या स्पर्धेत २००१ मधील लढतीत सेरेनाचा विजय
 १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत या दोघींत पहिली लढत
 त्यानंतर इतक्‍या आधीच्या फेरीत दोघी आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ

Web Title: sports news Serena Williams tennis