मला कोणासाठी काहीही सिद्ध करायचे नाही - सुशील

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

नवी दिल्ली - मला कोणासाठी काहीही सिद्ध करायचे नाही, असे सांगतानाच सुशील कुमारने आपण आपले लक्ष्य साध्य करण्यासाठीच खेळत आहोत. तिसरे ऑलिंपिक पदक जिंकण्याच्या आपल्या मोहिमेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक ही पहिली पायरी असेल, असेही त्याने सांगितले. 

सुशीलने गेल्या दोन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत सुवर्णपदक जिंकले आहे, तर ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझ आणि रौप्य पटकावले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून मी किती तयार आहे, हे माझ्या लक्षात येईल, असे सुशीलने सांगितले. कुस्ती सुरू केल्यापासून देशाकरिता यश मिळविणे हेच माझे लक्ष्य आहे. मी पूर्ण तंदुरुस्त असतो, त्या वेळी मी पूर्ण झोकून देतो. लोक काय विचार करतात, ते मी बदलू शकत नाही. मी कोणासाठी काही सिद्ध करणार नाही, असे त्याने सांगितले. 

दोन वर्षांपूर्वी ऑलिंपिक तर यंदा राष्ट्रकुल संघनिवडीतील सुशीलच्या समावेशावरून वाद झाला. मी ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. मला आता काहीही सिद्ध करायचे नाही. २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले होते. देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकून देण्याचे माझे स्वप्न आहे, असे सुशीलने सांगितले. टॉप (लक्ष्य ऑलिंपिक पदक) योजनेतून वगळल्याबद्दलही तो नाराज नाही. कोण काय म्हणते याकडे मी का लक्ष द्यावे. मी जीवनात खूप काही साध्य केले आहे, असेही तो म्हणाला. 

Web Title: sports news sushilkumar