सरकारची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबिणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे - वयोगटाच्या स्पर्धा घेताना येताना खेळाडूंच्या वय चोरी प्रकरणांना आळा घालण्यासाठी भारतीय टेनिस संघटनेने आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अन्य खेळांप्रमाणे टेनिसमध्येही खेळाडूंच्या वय चोरण्याच्या प्रकरणाचा फटका गेल्यावर्षी राष्ट्रीय स्पर्धांना बसला होता. या प्रकरणात त्रास आणि विनाकारण अन्याय सहन करावा लागणाऱ्या असंख्य पालकांनी सह्या करून एक निवेदन भारतीय टेनिस संघटनेला दिले होते. मात्र, त्या वेळी कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. याचे पडसाद संघटनेच्या रविवारी (ता. १) कोलकता येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधरण बैठकीत उमटले. 

या बैठकीमध्ये वय चोरी प्रकरण रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यावर एकमत झाले. यासाठी टेनिस संघटनेचे सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक चार सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला असून, वय चोरी प्रकरणी पालकांनी कसल्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी या समितीकडे दाद मागता येईल. त्याचबरोबर क्रीडा मंत्रालयाला या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची विनंती करण्यात आली असून, त्याचा अवलंब टेनिस संघटना या वर्षीपासून करणार आहे. भारतीय संघात निवड होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वैद्यकीय चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

टेनिस संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने या वृत्ताला दुजोरा दिला. तो अधिकारी म्हणाला, ‘‘एखाद्या खेळाडूवर वय चोरल्याचा संशय असेल, तर त्याची वैद्यकीय चाचणी होऊ शकते. पण, आपल्याकडे निश्‍चित वय सांगू शकेल तेवढी प्रगती चाचणी होत नाही. त्याहीपेक्षा या चाचणीला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. मग आम्ही काय करणार? असा प्रश्‍न कायम राहिल्यानेच आम्ही केंद्रीय क्रीडा खात्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला.’’

राष्ट्रीय क्रीडा नियमावली (२०११) नुसार वयचोरी प्रकरण हाताळण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वेही घालून देण्यात आली आहेत. त्याचाच आता ‘एआयटीए’ अवलंब करणार आहे. त्याचबरोबर संघटना आता सरकारने सूचित केलेल्या रुग्णालयात खेळाडूंची शारीरिक, दाताची तसेच ‘क्ष’ किरण चाचणी घेण्यात येणार आहे.

Web Title: sports news tennis pune

टॅग्स