इब्राहिमोविचशिवाय खेळणार स्वीडन

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

स्टॉकहोम (स्वीडन) - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत या वेळी झ्लाटन इब्राहिमोविच या अव्वल खेळाडूची उणीव जाणवणार आहे. रशियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांनी त्याच्या नावाचा विचारच झाला नाही, असे सांगितले. 

स्वीडनचे प्रशिक्षक यान अँडरसन यांनी त्याच्याशिवाय स्वीडन संघाची घोषणा केली. विश्‍वकरंडकासाठी त्यांनी निवडलेल्या संघात फारसे आश्‍चर्यकारक बदल नाहीत. इब्राहिमोविच किमान विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळेल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्‍वकरंडकाच्या प्ले-ऑफ लढतीत स्वीडनने इटलीवर विजय मिळविला होता. तेव्हापासून इब्राहिमोविच पुन्हा राष्ट्रीय संघात परतणार, असा अंदाज बांधला जात होता. 

विशेष म्हणजे उंचपुऱ्या इब्रहिमोविच याने २०१६ मध्ये राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो लॉस एंजलिस गॅलेक्‍झी संघाकडून खेळत आहे. निवृत्ती मागे घेण्याचा आपला अजिबात विचार नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.

Web Title: sports news World Cup football tournament Ibrahimovic