पाच कुस्तीगिरांवर दोन वर्षांच्या बंदीची शक्यता

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई/नवी दिल्ली - आशियाई कुस्ती स्पर्धेच्यावेळी भारताच्या पाच कुस्तीगिरांनी उत्तेजक चाचणीबाबत असहकार्य केल्याचा आरोप होत आहे. जागतिक उत्तेजक सेवन चाचणीच्या नियमानुसार चाचणीबाबत योग्य सहकार्य न केल्यास दोन वर्षांची बंदी येऊ शकते.

नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेच्यावेळी ऑस्ट्रेलिया क्रीडा उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे पथक आले होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत. या स्पर्धेच्या दृष्टीने ते संभाव्य क्रीडापटूंची उत्तेजक चाचणी घेत आहेत; मात्र भारतीय कुस्तीगिरांनी रात्री उशिरापर्यंत या चाचणीसाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले, असा या संस्थेचा दावा आहे. 

आशियाई स्पर्धेच्यावेळी हरप्रीत सिंग (८० किलो), गुरप्रीत सिंग (७५ किलो), रविंदर (६६ किलो), हरदीप (९८ किलो) आणि नवीन (१३० किलो) यांना उत्तेजक चाचणीसाठी मूत्र नमुने देण्यास सांगितले; पण हे नमुने रात्री देण्यात आले. भारतीय पथकास हे मान्य नाही. स्पर्धेपूर्वीची वजन चाचणी सुरू असतानाच या पथकाने उत्तेजक चाचणीसाठी मूत्र नमुना देण्याची मागणी केली. वजन चाचणीच्यावेळी कुस्तीगिरांनी आपल्या शरीरातील पाणी कमी केलेले असते. त्यामुळेच रात्री १०.३० वाजता नमुना देऊ शकलो, असे या संघाच्या मार्गदर्शकांनी सांगितले. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे प्रमुख नवीन अगरवाल यांनी ऑस्ट्रेलिया संस्थेने तक्रार करताना अन्य कोणत्याही गोष्टीऐवजी उत्तेजक चाचणीस महत्त्व देणे आवश्‍यक असल्याचा दावा केल्याचे सांगितले. भारतीय मार्गदर्शकांची याबाबत बाजू ऐकून घेतल्यानंतरच आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: sports news wrestling