रोहन बोपण्णा-डॅब्रोवस्की  मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत

पीटीआय
बुधवार, 7 जून 2017

पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाची सहकारी गॅब्रिएल डॅब्रोवस्की हिच्यासह फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी द्वितीय मानांकित सानिया मिर्झा-इव्हान डॉडिंग जोडीचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला. यंदाच्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत आता केवळ बोपण्णा हा एकमेव भारतीय खेळाडू आव्हान टिकवून आहे. पुरुष दुहेरीत त्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. महिला दुहेरीत यारोस्लावा श्‍वेडोव्हा हिच्या साथीत खेळणाऱ्या सानिया मिर्झाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.

Web Title: sports Rohan Bopanna French Open Tennis