आर्थिक संकटात सापडलेला श्रीलंकाच 'आशिया कप' करणार आयोजित?

Sri Lanka Cricket Board keen to host Asia Cup Amid major economic crisis
Sri Lanka Cricket Board keen to host Asia Cup Amid major economic crisis esakal

दुबई : श्रीलंका मोठ्या आर्धिक संकटात सापडलेला असूनही येत्या 27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे (Asia Cup) आयोजन करण्यास उत्सुक आहे. याबाबतची माहिती एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या (Asian Cricket Council) सूत्रांनी दिली आहे. ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यात होणार आहे. आशिया कपचे यजमानपद (Host) हे श्रीलंकेकडेच होते. मात्र देश काही काळापासून आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांचे आशिया कपचे यजमानपद धोक्यात आले होते.

Sri Lanka Cricket Board keen to host Asia Cup Amid major economic crisis
Chelsea FC : चेल्सी अखेर 42 हजार कोटी रूपयात विकली गेली

दरम्यान, सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार 'अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल फायनलवेळी श्रीलंका क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष यांची भेट झाली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की श्रीलंका (Sri Lanka Cricket Board) आशिया कप आयोजित करण्यासाठी उत्सुक आहेत त्या दृष्टीने ते तयारी देखील करत आहेत. श्रीलंका क्रिकेट आशिया कप आयोजित करण्याबाबत उत्साही असल्याचे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.'

यापूर्वी, एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांनी एएनआयला सांगितले होते की ते श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी आयपीएल फायनलवेळी बोलणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतचा अंतिम निर्णय अजून घेतला गेलेला नाही. आशिया कपचे आयोजन करण्यासाठी युएई आणि बांगलादेश यासारखे पर्याय देखील चाचपून पाहिले जात आहेत.

Sri Lanka Cricket Board keen to host Asia Cup Amid major economic crisis
Champions League विजेत्या माद्रिदचे ट्विट, IPL जिंकणाऱ्या गुजरातची कमेंट

सूत्रांनी सांगितले की, 'आशिया कप स्पर्धा ही त्याच्या निश्चित तारखेच्या आधी देखील सुरू होऊ शकते. याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेताला जाण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ही एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अधिकारी करतील.'

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अन्न आणि इंधनाचा तेथे मोठ्याप्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. कोरोनामुळे देशाचे प्रमुख उत्पन्नाचे साधन पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटनाचा श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा आहे. याचबरोबर श्रीलंकेकडे विदेशी गंगाजळीची देखील मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना अन्न आणि इंधन आयात करण्यासाठी देखील अडचणी येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी श्रीलंकेला शेजारच्या मित्रराष्ट्रावर अवलंबून रहावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com