
मुंबईत भारताविरुद्ध झालेला 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आम्ही जाणीवपूर्वक गमावला, असा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या तत्कालीन क्रीडामंत्र्यांना माजी कर्णधार कुमार संघकारा आणि माहेला जयवर्धने यांनीच घरचा आहेर दिला.
कोलंबो : मुंबईत भारताविरुद्ध झालेला 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आम्ही जाणीवपूर्वक गमावला, असा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या तत्कालीन क्रीडामंत्र्यांना माजी कर्णधार कुमार संघकारा आणि माहेला जयवर्धने यांनीच घरचा आहेर दिला. पुरावे द्या आणि मगच आरोप करा, अशा शब्दात त्यांनी माजी क्रीडामंत्र्यांना सुनावले आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना फिक्स होता, असा दावा श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री असलेल्या महिंदानंदा अलूतागमांगे यांनी केला काल केला होता. त्यावर त्यावेळी श्रीलंका संघाचा कर्णधार असलेल्या संगकारा आणि अंतिम सामन्यात शतक करणाऱ्या जयवर्धने चपराक लगावली आहे. बिनबुडाचे आरोप केले जाऊ लागले आहेत म्हणजे आता कोणती निवडणूक आहे का ? नाव आणि पुरावे द्या असा सवाल संगकाराने महिंदानंदा यांना ट्विटरवरुन विचारला आहे.
लॉकडाऊनमुळे मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम; वाचा बातमी
तो अंतिम सामना फिक्स करण्यात खेळाडूंचा हात नव्हता कोणती तरी बाह्य शक्तीने हा काम केले आहे, असे महिंदानंदा यांनी म्हटलेले. परंतु कोणतीही अधिक माहिती किंवा कोणाच्या नावाचाही उल्लेख केला नव्हता. ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही चर्चेसाठी मी तयार आहे. लोकांनामध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. प्रामाणिकपणे किकेट खेळणारे आम्ही खेळाडू आहोत, असेही जयवर्धनेने म्हटले आहे.
मोठी बातमी : ...म्हणून सुशांत होता प्रचंड तणावात ? तीन दिवसांपूर्वीच नोकरांना म्हणाला....
2011 च्या त्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेचे नेतृत्व करणारा संगकारा म्हणतो, या आरोपांच्या तळाशी जाणे योग्य ठरेल. विनाकारण अंदाज व्यक्त करू नये हीच खरी त्यावरची कार्यवाही ठरेल.