BAN vs SL Test Series : एकही शतक न ठोकता श्रीलंकेच्या फलंदाजांनी केला बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत मोठा विक्रम

BAN vs SL
BAN vs SLESAKAL

BAN vs SL Test Series : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात चिटग्राम येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अतंर्गत ही कसोटी मालिका होत आहे. या कसोटीत श्रीलंकेच्या फलंदाजांनी 531 धावा केल्या. विशेष म्हणजे यामध्ये एकाही फलंदाजाच्या शतकाचा समावेश नाही. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही.

मात्र तरी देखील श्रीलंकेने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्यांनी एकाही फलंदाजाने शतकी खेळी न करता कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेच्या पहिल्या सात फलंदाजांपैकी सहा फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.

मात्र ते शतकी खेळी करण्यापासून अवघ्या काही धावांनी हुकले. श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा कुसल मेंडीसने केल्या. तो 93 धावा करून बाद झाला. कुसल मेंडीस पाठोपाठ कमिंदू मेंडीसने नाबाद 92 धावा केल्या.

BAN vs SL
Shaheen Afridi PCB Crisis : पाकिस्तानच्या कॅप्टन्सीचा वाद टिपेला, पीसीबीनं छापलं शाहीनचं खोटं वक्तव्य?

कमिंदू मेंडीस हा आपले सलग तिसरे कसोटी शतक ठोकण्यापासून अवघ्या 8 धावा दूर राहिला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ बाद झाला. श्रीलंकेने भारताचा विक्रम मोडला. 1976 मध्ये भारताने न्यूझीलंडविरूद्ध कानपूर कसोटीत 9 बाद 524 धावा केल्या होत्या. त्यावेळी देखील भारताच्या एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नव्हती. त्याही सामन्यात भारताकडून सहा फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती.

दरम्यान, दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी बांगलादेशच्या फलंदाजांना पहिला धक्का बसला राहिरू कुमाराने हसन जॉयची दांडी गुल केली. मात्र त्यानंतर नाईट वॉचमन तैजुल इस्लाम आणि झाकीर हसन यांनी दिवसचा खेळ संपेपर्यंत लंकेला यश मिळू दिलं नाही. बांगलादेशने दिवसअखेर 1 बाद 55 धावा केल्या होत्या.

BAN vs SL
Shahid Afridi: 'बदल करायचाच होता, तर...' जावयाची कर्णधारपदावरून हाकालपट्टी होताच शाहिद आफ्रिदीची PCB वर टीका

बांगलादेशला श्रीलंकेचा डाव संपवण्यासाठी 159 षटके टाकावी लागली. शाकिब अल हसनने 110 धावात 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हसन महमूदने पदार्पणाच्या सामन्यात चांगला मारा केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची अवस्था 6 बाद 131 धावा अशी झाली होती. झाकीर हसनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र श्रीलंकेच्या विश्वा फर्नांडो आणि अतिशा फर्नांडो यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर लाहिरू आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Cricket Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com