esakal | 'ग्रेट विन बॉइज'; चाहर-सूर्यानं विराटचही मनं जिंकलं!
sakal

बोलून बातमी शोधा

SL vs IND

'ग्रेट विन बॉइज'; चाहर-सूर्यानं विराटचही मनं जिंकलं!

sakal_logo
By
सुशांत जाधव

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. दुसऱ्या वनडे सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhavan) नेतृत्वाखालील टीम इंडियाला श्रीलंकेनं 276 धावांच आव्हान दिले होते. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर सुर्य कुमार यादवने (Surya) दमदार अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तो बाद झाल्यानंतर पुन्हा भारतीय संघ अडचणीत सापडला. 200 च्या आतच भारतीय संघाने 7 विकेट गमावल्या होत्या. (Sri Lanka vs India, 2nd ODIIndia won by 3 wkts Virat Kohli Says Great win boys)

शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत बरोबरी करणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र दीपक चाहर (Deepak chahar) आणि उप कर्णधार भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) त्यांचा हाततोंडचा घास हिसकावून घेतला. भारतीय संघाची लोअर ऑर्डरमध्येही सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असल्याचे या जोडीने दाखवून दिले. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: IND vs SL: भुवी-चाहरची कमाल, बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिली मॅच

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्याच्या घडीला कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या विराट कोहलीने धवनच्या नेतृत्वाखाल भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचा आनंद व्यक्त केलाय. ग्रेट विन बॉइज...कठिण परिस्थितीत तुम्ही विजय खेचून आणला. हा रंगतदार सामना पाहायला मजा आली. दीपक चाह आणि सूर्या दबावात तुम्ही अतिशय सुंदर फलंदाजी केली, असा उल्लेखही विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये केलाय. दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना 23 जुलैला रंगणार आहे. श्रीलंका घरच्या मैदानावर टी-20 मालिकेपूर्वी आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे भारतीय संघ क्लिनस्वीपसह मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

हेही वाचा: SL vs IND : चाहरचा कहर; पहिल्या-वहिल्या फिफ्टीसह मॅच विनिंग खेळी!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामना जिंकून श्रीलंकेला मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. श्रीलंकेने भारतीय संघाला अडचणीतही आणले होते. मात्र भुवी आणि दीपक चाहरने श्रीलंकेचे इरादे अक्षरश: उधळून लावले. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 84 धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली.

loading image