esakal | SL vs IND : चाहरचा कहर; पहिल्या-वहिल्या फिफ्टीसह मॅच विनिंग खेळी!
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Chahar

SL vs IND : चाहरचा कहर; पहिल्या-वहिल्या फिफ्टीसह मॅच विनिंग खेळी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरने गोलंदाजीनंतर फलंदाजीतील धमक दाखवून दिली. सामना श्रीलंकेच्या बाजूनं झुकतोय असे चित्र निर्माण झाले असताना भुवी आणि दीपक चाहरने पारडे पुन्हा भारताच्या बाजूने वळवले. दोघांनी आठव्या विकेटसाठी 67 + धावांची भागीदारी केली. (Sri Lanka vs India 2nd ODI Deepak Chahar Maiden International Fifty)

हेही वाचा: Video: टप्पात आला अन् कार्यक्रमच केला! पाहा 'पॉवरफुल' सिक्सर

शेवटच्या षटकात 3 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर चौकार खेचत दीपक चाहरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दीपक चाहरने भुवीच्या साथीने 84 धावांची भागीदारी केली. त्याने 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 82 चेंडूत 69 धावा केल्या. ज्यावेळी संयम दाखवण्याची गरज होती त्यावेळी त्याने शांत रहाणे पसंती केली. विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर त्याच्या भात्यातून फटकेबाजीही पाहायला मिळाली. आपल्यात एक ऑल राउंडर आहे हेच त्याने या सामन्यातील खेळीतून दाखवून दिले.

हेही वाचा: Olympics 2020 : गोल्डन गर्ल राही पदकाची दावेदार असण्यामागची 5 कारणं

श्रीलंकेच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 77 धावांची खेळी करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. एम भानूकाच्या रुपात श्रीलंकेला पहिला धक्का बसला. तो 36 धावा करुन माघारी फिरला. अविष्काच्या 50 धावा, असलंकाची 65 धावांची खेळी आणि करुणारत्नने केलेल्या 44 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 50 षटकात 275 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य टीम इंडियासमोर ठेवले होते.

हेही वाचा: SL vs IND : भुवीनं 6 वर्षानंतर टाकला नो बॉल!

या धावांचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ 13, शिखर धवन 29 आणि ईशान किशन 1 धाव करुन बाद झाला. 3 बाद 65 धावा अशी बिकट अवस्था असताना मनिष पांडे आणि सूर्या कुमार यादव यांनी 40 धावांची भागीदारी केली. मनिष पांडे 37 धावा करुन परतल्यानंतर सूर्याने पहिले वहिले अर्धशतक पूर्ण केले. कृणाल पांड्याने 35 धावांची उपयुक्त खेळी केली. भारतीय संघाने 193 धावांत 7 विकेट गमावल्यामुळे श्रीलंकेचा संघ फ्रंटफूटवर होता. पण भुवी आणि दीपक चाहरने दमदार खेळी करत श्रीलंकेचे इरादने उधळून लावले.

हेही वाचा: IND vs SL: भुवी-चाहरची कमाल, बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिली मॅच

loading image